आरएसएस मोहन भागवत आणि अण्णा हजारे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर काल (दि.26) रात्री 9.51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. जगभरातून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. अर्थकारणातील सरदार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या देशाच्या प्रगतीच्या योगदानाची आठवण करुन दिली आहे. मोहन भागवत यांनी आरएसएसच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की, भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे ज्येष्ठ नेते डॉ. सरदार मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश अत्यंत दुःखी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य प्रियजनांना आणि चाहत्यांना मनापासून शोक व्यक्त करतो, असे लिहिण्यात आले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
पुढे म्हणाले आहे की, “डॉ. मनमोहन सिंग यांनी सामान्य पार्श्वभूमीतून आले असूनही, त्यांनी देशातील सर्वोच्च पद भूषवले. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. सिंग यांचे भारतासाठीचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल आणि जपले जाईल.दिवंगत आत्म्याला सद्गती मिळावी अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो,” अशा भावना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत.
The entire nation is extremely saddened by the demise of former Prime Minister of Bharat and senior leader of the country Dr. Sardar Manmohan Singh. Rashtriya Swayamsevak Sangh expresses its deepest condolences to his family and countless loved ones and admirers.
Dr. Manmohan… pic.twitter.com/3sAt9dgTne— RSS (@RSSorg) December 27, 2024
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
याचबरोबर डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आदरांजली वाहिली आहे. अण्णा हजारे म्हणाले आहेत की, “काही माणसं जन्माला येतात आणि जातात मात्र काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात त्यापैकी मनमोहन सिंग होते. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची आणि माझी अनेक वेळा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुखद निधन झाल्याने दुख वाटले. मनमोहन सिंग हे खऱ्या अथनि सच्चा माणूस होता. नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रुढीप्रमाणे माणसं येतात जातात मात्र एक सच्चा माणूस गेल्याने दुख वाटले अशा भावना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या आहेत.