जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश
विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारा कॅप्टन स्मित मच्छार; 18 वर्षांच्या सेवेतील भयानक अनुभव
कुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अप्रतिम खेळ करीत कांदिवलीच्या ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा १० गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. कनिष्ठ महाविद्यालयाने ९व्यांदा जिल्ह्याचे विजेतेपद पटकावले आहे. या संघातील विश्वजीत राजाराम पाटील, विवेक जगन्नाथ चोरघे, चेतन दीपक सणस, आर्यन जितेंद्र मोरे, शिवांश गजानन मगर, सागर संतोष धाडवाड, साहिल उदयराज यादव, आर्यन विठ्ठल वाघमारे, साई सुनील खोपकर, हर्ष शिवकुमार सिंग, शुभम संदीपान महानवर व प्रतीक प्रवीण मोरे यांची ठाणे येथे होणाऱ्या मुंबई विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील मुलीच्या गटात कनिष्ठ महाविद्यालयाच्या संधाने बाफना ज्युनियर कॉलेजचा पराभव करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या संधामध्ये वैष्णवी बबन दुरगुडे, आयुषी श्यामसुंदर कनोजिया, श्रुतिका संतोष पार्ट, अमरीन अय्युब शेख, पल्लवी सिद्धार्थ जाधव, शर्वरी प्रदीप लांबे, सृष्टी सतोष साळवी, श्वेता संतोष देशमाने, देवयानी दीपक कांबळे, वैदही अमित कदम, सिद्धी संतोष शेळके, कृष्णा नीलेश भंडारे यांचा समावेश होता.
ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
सुयशघ्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे आणि क्रीडा शिक्षक शिवाजी कालेकर, सुनील तांबे व सचिन पाष्टे यांचे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव, कुर्ला तालुका क्रीडा अधिकारी ऋतुजा कडलगे, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






