Satara News: ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित आकर्षक सजावट
Satara News: यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपुरक ठरावा यासाठी पालिकेने पुढाकार घेत पालिका कार्यालयातच शाडुमातीच्या श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन पर्यावरणाचा संदेश देत सर्वांनीच पर्यावरण जोपासून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सन २०११ साली पालिकेने नव्याने बांधलेल्या पालिकेच्या इमारतीमध्ये यंदा प्रथमच गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. पालिकेने यासाठी खास शाडुमातीची इकोफ्रेंडली गणरायाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आहे, याबरोबरच स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले असुन देखावा सादर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व वस्तु या नैसर्गिक आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पाच नैसर्गिक तत्त्वांचा सुंदर संगम साकारण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरसह पंजाब, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस; अनेक नद्यांना पूर; गावे बुडाली
सजावटीद्वारे वातावरणातील बदल का होतात, त्यामागील कारणे आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम याची दृश्यात्मक उदाहरणे आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहेत. नागरिकांना जलवायू बदल, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण याबाबत जागरूक करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी “सेल्फी पॉईंट” तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यंदा प्रथमच नव्या इमारतीमध्ये श्री. गणेशाची स्थापना करण्यात आल्याने या गणेशोत्सवात सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभागी होत यंदाचा गणेशोत्सव अधिक आकर्षक बनवला आहे.
म्हसवड नगरपरिषदेने “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेचे संवर्धन हे आपले सामूहिक कर्तव्य असल्याचे नगरपरिषदेकडुन सांगितले जात आहे.
BWF World Championships : PV Sindhu चे स्वप्नभंग! क्वार्टरफायनलमध्ये इंडोनेशियाच्या कुसुमा
नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, प्लास्टिकचा वापर टाळावा, थर्माकोलच्या सजावटीऐवजी पर्यावरणपूरक सजावट करावी. गणेश विसर्जनासाठी पर्यावरणस्नेही पद्धतींचा अवलंब करावा, शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे लवकरात लवकर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन होण्यासाठी कृत्रिम हौदाची व निर्मल्य कलश इत्यादी,सोय करण्यात आली आहे. पीओपी मिश्रित मूर्तींकरिता स्वतंत्र टाक्या बसविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी नागरीकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे – मुख्याधिकारी डॉ सचिन माने – सध्या
माझी वसुंधरा अभियान ६.०, स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि LiFE मिशन अंतर्गत राबवले जात असून, नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत असुन यावर्षीच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन व्हावे, यासाठी म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या पारंपरिक ठिकाणी तसेच कृत्रिम हौद , तलाव आणि नदीपात्रांमध्ये स्वच्छता करून सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
म्हसवड शहरातील विविध भागांत १ दिवस, ५ दिवस, ७ दिवस व १० दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून, विसर्जनाच्या सर्व ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हसवड माणगांगा नदीपात्रात रबरी बोटीसह नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्यात आली आहे.