फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यामध्ये ट्राय सिरीज खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये ७ सामने खेळवले जाणार आहे. यामध्ये पहिले ६ सामन्यामध्ये जो संघ जास्त सामने जिंकले त्या संघांना फायनलचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. ट्राय सिरिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला. वेगवान गोलंदाज हरिस रौफने घातक गोलंदाजी केली.
सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने २० षटकांत सात गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तान संघ २० षटकांत १४३ धावा करून सर्वबाद झाला.
Not the result we would have wanted to begin our journey with, but #AfghanAtalan will look to bounce back stronger when they get to the field again. 👍#UAETriNationSeries | #AFGvPAK | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/dYXZtQvh8g
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 29, 2025
कर्णधाराच्या अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. ८३ धावांवर संघाने चार विकेट गमावल्या. तथापि, कर्णधार सलमान आघाने एका टोकाला धरून छोट्या भागीदारी करून संघाला लढाऊ धावसंख्या गाठून दिली. संघाकडून साहिबजादा फरहानने २१ धावा, सॅम अयुबने १४, फखर जमानने २०, हसन नवाज ९, मोहम्मद नवाज २१, मोहम्मद हरिस १५ आणि फहीम अश्रफने १४ धावा केल्या. कर्णधार आघा याने ५३ धावांची नाबाद खेळी केली. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात करणाऱ्या अफगाणिस्तानने धडपड सुरू केली. इब्राहिम झद्रान ९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतताच, लागोपाठ एकामागोमाग विकेट पडू लागल्या. ९७ धावांपर्यंत पोहोचेपर्यंत अफगाणिस्तानने ७ विकेट गमावल्या. संघाने पाच धावांच्या आत पाच विकेट गमावल्या.
तथापि, विकेट पडण्याच्या दरम्यान, कर्णधार रशीद खानने १६ चेंडूत ३९ धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान, रशीद खानने पाच उंच षटकार मारले, ज्यात हरिस रौफच्या एका षटकात तीन षटकारांचा समावेश होता. जेव्हा रशीद क्रीजवर होता तेव्हा अफगाणिस्तान विजयाकडे वाटचाल करत होता, परंतु तो बाद होताच, आशा भंग पावली. पाकिस्तानकडून हरिस रौफने ३.५ षटकांत ३१ धावा देत ४ बळी घेतले. अफगाणिस्तानचे ७ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. रशीदने सर्वाधिक ३९ धावा केल्या. याशिवाय रहमानउल्लाह गुरबाजने ३८ धावांचे योगदान दिले.