रायपूर: छत्तीसगडमधील रायपूर(Raipur) येथे काँग्रेसचे (Congress) 85 वे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात काँग्रेसच्या साधारण 1500 प्रतिनिधींनी हजेरी लावली. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीदेखील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला सगळ्यात जास्त समाधान आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. सोनिया गांधींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
[read_also content=”‘लक्ष्य’ फेम अभिजीत श्वेतचंद्रचं शुभमंगल सावधान, सेजल वर्देसह बांधली लग्नगाठ,पाहा Photo https://www.navarashtra.com/movies/abhijeet-shwetchandra-got-married-with-sejal-varde-nrsr-372243.html”]
सोनिया गांधी महाअधिवेशनात म्हाणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचं सगळ्यात जास्त समाधान आहे.”
भारत जोडो यात्रेचं कौतुक
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची सोनिया यांनी यावेळी स्तुती केली. त्या म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेने चांगलं काम केलं आहे. ज्या प्रकारे राहुल यांनी या यात्रेमध्ये लोकांच्या जवळ जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ते वाखाणण्याजोगं आहे.
मोदी सरकारकडून काही उद्योगपतींना झुकतं माप
काँग्रेस आणि देशासाठी ही खूप आव्हानात्मक वेळ आहे. देशातील प्रत्येक संस्थेवर भाजप- आरएसएसने आक्रमण केलं आहे. काही मोजक्या उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. सध्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या. अदानी उद्योग समूहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे. त्यावरून त्यांनी मोदी सरकारवर केलेली ही टीका आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी साधारण 11 वाजता महाअधिवेशनाची औपचारिक सुरुवात वंदे मातरम गीताने झाली.