रायपूर: काँग्रेसच्या (Congress) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज रायपूरमध्ये (Raipur) पक्षाच्या महा अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी सांगितलं की काँग्रेस फक्त राजकीय पक्ष नसून लोकांसाठीच व्यासपीठ आहे. आम्ही 10 वर्ष मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात प्रामाणिक आणि चांगलं सरकार दिलं होतं. आम्ही लोकशाही मजबूत करण्यासाठी तयार आहोत. भारत जोडो यात्रेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
This is a challenging time for Congress & the country as a whole. BJP-RSS has captured and subverted every single institution in the country. It has caused economic ruin by favouring a few businessmen: Cong MP & UPA chairperson Sonia Gandhi in Raipur, Chhattisgarh pic.twitter.com/ad4JQ3cFrd
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 25, 2023
मोदी सरकारकडून काही उद्योगपतींना झुकतं माप
काँग्रेस आणि देशासाठी ही खूप आव्हानात्मक वेळ आहे. देशातील प्रत्येक संस्थेवर भाजप- आरएसएसने आक्रमण केलं आहे. काही मोजक्या उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. सध्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या. अदानी उद्योग समूहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे. त्यावरून त्यांनी मोदी सरकारवर केलेली ही टीका आहे.
भारत जोडो यात्रेचं कौतुक
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची सोनिया यांनी यावेळी स्तुती केली. त्या म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेने चांगलं काम केलं आहे. ज्या प्रकारे राहुल यांनी या यात्रेमध्ये लोकांच्या जवळ जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ते वाखाणण्याजोगं आहे.
प्रियंका गांधींचं जंगी स्वागत
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी साधारण 11 वाजता महाअधिवेशनाची औपचारिक सुरुवात वंदे मातरम गीताने झाली. महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी सकाळी 9 वाजता रायपूरला आल्या. त्यांचं यावेळी भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी भव्य रोड शो करण्यात आला. प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस समर्थकांनी रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षावही करण्यात आला.