नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना बुधवारी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रियांका गांधी वढेराही होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींना श्वास घेण्यास त्रास होत होता.
[read_also content=”संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच अजित पवार ठाम, महापुरुषांचा अवमान केला नाही, शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल, भाजपा नेत्यांचं काय? अजित पवारांचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/ajit-pawar-asserted-that-sambhaji-maharaj-is-swarajya-rakshak-he-did-not-disrespect-the-great-men-what-about-the-governors-and-bjp-leaders-who-disrespected-shivaraya-ajit-pawar-question-359183.html”]
सोनिया यांना बुधवारी नियमित तपासणीसाठी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी सोनिया यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १२ जून रोजी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधी यांना २ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून गंगाराम रुग्णालयात त्यांची नियमित तपासणी केली जात आहे.