मुंबई, एल अँड टी, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा (BSE) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स गुरुवारी 372 अंकांनी घसरला. सेंसेक्स (Sensex) दिवसअखेर 59,636.01 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 133.85 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी घसरून 17,764.80 वर स्थिरावला.
सेन्सेक्स कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरला. टेक महिंद्रा, एल अँड टी, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेचे समभागही तोट्यात गेले. दुसरीकडे, एसबीआय, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग वाढीसह बंद झाले.
पेटीएमचे शेअर्स गडगडले
शेअर बाजाराचा मूड पेटीएमने बिघडविला. पेटीएमचा आयपीओ लिस्टिंग होताच घसरण आणि दिवसअखेर 20 टक्क्यांवर बंद झाल्यामुळे छोट्या गुंतवणुकदारांच्या पदरी निराशा आली.
[read_also content=”५०० झालेली शुगर एका दिवसात येईल नॉर्मल; चमत्कारिक आहे ‘हा’ घरगुती उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/500-sugar-will-return-to-normal-in-a-day-this-is-a-wonderful-home-remedy-nrng-203639.html”]
‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन 97 कम्युनिकेशन्स’च्या विक्रमी 18,300 कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) एका आठवड्यामध्येच कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 20 टक्क्यांनी गडगडली. यामुळे लहान-मोठ्या सर्वच गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. शॉर्ट टर्मसाठी या शेअर्सच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करणारे अनेक छोटे गुंतवणूकदार निराश झाले.