विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा; कर्नाटकात शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा!

नेहमीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना दुध देण्यात आलं. मात्र दुध प्यायल्यानंतर मारे 23 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून राज्यातील बालकांना मोफत आहार (Mid Day Meal) दिला जातो. मात्र, विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहण्याऐवजी बिघडण्याचं प्रमाण अलीकडच्या काही घटनामंधुन दिसुन येत. याचं कारण म्हणजे, शालेय पोषण आहारात होणारा हलगर्जीपणा. अनेकदा शालेय पोषण आहारात कधी निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याच्या तक्रारी समोर येतात. असाच एक प्रकार कर्नाटकातुन उघडकीस आला आहे. येथील बेळगावी येथीला एका शाळेत पाल पडलेलं दुध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poison In School In Karnataka) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुधातून विषबाषा झाल्यामुळे 23 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

  कुठं घडली घटना

  मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगावी येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुवारी, 11 जानेवारीला ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना दुध देण्यात आलं. मात्र दुध प्यायल्यानंतर मारे 23 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिक्षण विभागानं या घटनेची दखल घेतली असून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.

  नेमकं काय घडलं

  बेळगावी गावातील कर्नाटक पब्लिक स्कूलच्या कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना दुपारी दूध पाजण्यात आलं. त्यापैकी काहींनी उलट्या आणि अस्वस्थतेची तक्रार केली. सुमारे 23 विद्यार्थ्यांना हुक्केरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही पालकांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली असून त्याची चौकशी सध्या सुरु आहे.

  दोषींवर होणार कारवाई

  शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”बेळगावी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व दूध पिणाऱ्या मुलांना संकेश्वर रुग्णालयात दाखल केलं. विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मूळ कारण सांगणं टाळलं.” या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे..