भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत (फोटो सौजन्य-X)
चेन्नई : तामिळनाडूमध्ये भाजपचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल? सर्वांच्या नजरा यावर आहेत. याचे कारण म्हणजे भाजपचे विद्यमान अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आपण नेतृत्वाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अन्नामलाई यांच्या या घोषणेनंतर, केंद्रीयमंत्री मुरुगन यांचे नाव सर्वात आधी पुढे आले.
मुरुगन नवीन अध्यक्ष होण्यामागील युक्तिवाद म्हणजे त्यांचे अण्णा द्रमुकशी चांगले संबंध आहेत. अन्नामलाई राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रीय राजकारणात प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा झाली. तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत मुरुगन यांच्याशिवाय आमदार नैनर नागेंद्रन यांचे नाव पुढे आले होते. जयललिता यांच्या निधनानंतर भाजपमध्ये सहभागी झालेले नागेंद्रन सध्या विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. 2021 मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर तिरुनेलवेली जागा जिंकली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा चेन्नईत पोहोचण्याच्या काही तास आधी भाजपने नवीन अध्यक्ष निवडीच्या निकषांची घोषणा केली. यामध्ये पक्षाने म्हटले आहे की, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना किमान 10 वर्षे पक्षाचे सदस्यत्व आवश्यक असेल. या नियमानंतर, नवीन पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले एन. नागेंद्रन यांनाही शर्यतीतून बाहेर राहावे लागले.
ऑगस्ट 2017 मध्ये ते अण्णा द्रमुकमधून पक्षात सहभागी झाले. अशा परिस्थितीत, त्यांनी भाजपचे सदस्य म्हणून 10 वर्षे पूर्ण केलेली नाहीत. आता अशी चर्चा आहे की, पक्ष एखाद्या संघटनेशी संबंधित चेहऱ्याकडे कमान सोपवू शकतो. सध्या राज्यात द्रमुक आणि काँग्रेस युती सत्तेत आहे. पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीला 11 महिने शिल्लक आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुक एकत्र आल्यानंतर, अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके काय करणार याची चर्चा सुरू आहे.
या शर्यतीत कोण-कोण?
भाजप 13 एप्रिल रोजी तामिळनाडूच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. नैनार नागेंद्रन यांचे नाव आतापर्यंत आघाडीवर होते, पण पक्ष अण्णाद्रमुकमधून आलेल्या नेत्याकडे संघटनेची कमान सोपवेल का? ते पाहणे गरजेचे असेल. नागेंद्रन हे थेवर समुदायाचे आहेत. अशा परिस्थितीत भाजप काही नवा धक्का देऊ शकते. सर्वांच्या नजरा यावर खिळल्या आहेत. अध्यक्षपदाच्या दावेदार वनाथी श्रीनिवासन आणि तमिलिसाई सुंदरराजन यांची नावे आहेत.