नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीएला बहुमत मिळाले. रविवारी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. या निवडणुकीत इंडिया आघाडीनेही (INDIA) चांगली कामगिरी केली. काँग्रेसने 99 जागांवर विजय मिळवला. सध्या एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यातच दोन्ही पक्षांचे लोकसभा अध्यक्षपदाकडे लक्ष लागले आहे.
टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांना महत्वाची पद दिली जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. दरम्यान, सध्या लोकसभा अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. या सरकारमध्ये ‘किंगमेकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी भाजपकडे लोकसभेच्या अध्यक्षपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे.
टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार या दोन्ही नेत्यांची लोकसभा अध्यक्षपदाकडे लक्ष आहे. गेल्या काही वर्षांत सत्ताधारी पक्षांतर्गत बंडखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत फूट पडली आहे आणि अनेक ठिकाणी राज्य सरकारेही पडली आहेत, यामुळे लोकसभा अध्यक्षपद महत्वाचे मानले जाते.
दरम्यान, पक्ष फूटीमध्ये किवा सदस्यांच्या फुटीमध्ये पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो आणि हा कायदा सभागृहाच्या अध्यक्षांना जास्त आहे. पक्षांतराच्या कारणास्तव सदस्यांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे. त्यामुळे या पदावर दोन्ही नेत्यांचे डोळे लागले आहेत.