तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
तेलंगणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणा राज्यातील जाडचेरला येथील नरसी मोनजी इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) च्या अनेक विद्यार्थ्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या या विद्यार्थ्यांचा आकडा 80 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. जेवण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप,पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. दरम्यान या प्रकरणात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
दरम्यान, NMIMS च्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना रूग्णालयात नेण्याऐवजी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका खाजगी डॉक्टरने विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या आणि कॉमन रूमच्या जवळ या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार केले, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार, पी. अनिरुद्ध रेड्डी यांनी संस्थेत जाऊन तेथील संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉक्टरांच्या पात्रतेवर आणि वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेवर प्रश्न उपस्थित करत आमदारांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांचे मॅनेजमेंटवर गंभीर आरोप
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांकडून समोर आलेल्या निवदेनानुसार, प्रशासनाचे अपयश केवळ सुरक्षित आणि स्वच्छ अन्न पुरवण्यापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर दबाव आणला तेव्हा रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.
हेही वाचा: फूड पॉयझनिंग आणि त्याचे लक्षणे काय आहेत? जाणून घ्या
विद्यार्थ्यांकडून खाण्याच्या गुणवत्तेवर शंका
विश्वविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत विद्यार्थ्यांनी आवाह उठवला होता. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ही काही पहिल्यांदा घडलेली घटना नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मेसमध्ये दिले जाणारे जेवण, किराणा सामान, भाज्या आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विद्यार्थ्यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे.
फूड पॉयझनिंग आणि त्याचे लक्षणे काय आहेत? जाणून घ्या
फूड पॉयझनिंग म्हणजे विषारी अन्न किंवा पाणी पिऊन होणारे आजार. हे पचन संस्थेवर परिणाम करते आणि काही लक्षणे आपल्याला जाणवू लागतात. चला, त्याच्या काही प्रमुख लक्षणांची माहिती पाहूयात. अशी अनके लक्षणे आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्याला याचा त्रास होत आहे का? हे जाणून घेऊ शकतो. फूड पॉयझनिंग झाल्यावर आपले शरीर काही संकेत देतात. ते कोणते? चला तर मग जाणून घेऊयात.
खराब किंवा कालबाह्य अन्न पदार्थांमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामुळे सॅल्मोनेला किंवा ई. कोली सारख्या विषाणूंमुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्यासाठी अन्नाचे उत्पादन तारीख आणि योग्य साठवण तपासणे महत्त्वाचे आहे. काही औषधं, जसे की ऍंटीबायोटिक्स, आपल्या पचनसंस्थेच्या नैसर्गिक संतुलनाला बाधा आणू शकतात, ज्यामुळे जास्त चव लागण्याचा आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका वाढतो. औषधांचा योग्य वापर आणि त्यांचे expiry डेट तपासणे आवश्यक आहे.