(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ एका वर्गातील आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी अचानक त्याच्या जागेवरून उठतो आणि गणिताच्या शिक्षिकेला मारु लागतो. विद्यार्थ्याने कधी शिक्षिकेला थप्पड मारली तर कधी तिला मुक्का मारला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गातील इतर विद्यार्थिनी त्याच्या बचावासाठी आल्या तेव्हा विद्यार्थ्याने त्यांच्यावरही हल्ला केला. गणितात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने संताप व्यक्त केला आणि त्याने वर्गातील शिक्षकावर हल्ला केल्याचे वृत्त आहे.
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गणिताचे शिक्षक खुर्चीवर आरामात बसलेले दिसत आहेत, तर विद्यार्थी आणि विद्यार्थी समोरच्या जागांवर बसलेले दिसत आहेत. गणिताच्या शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि त्यांचे पेपर तपासल्यानंतर त्यांना गुण दिले. ही परीक्षा २० गुणांची होती आणि काही विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण मिळाले, तर काहींना कमी गुण मिळाले. वर्गातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला गणिताच्या शिक्षकाने २० पैकी १८ गुण दिले, जे त्याला आवडले नाही आणि म्हणूनच त्याने शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली.
A Thai math teacher was brutally att@cked by her 17-year-old student, enraged over scoring 18 out of 20 on a test.
pic.twitter.com/GLLunQYH4x — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 9, 2026
काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अलिकडेच भारतात अशीच एक घटना घडली. पण, त्या मुलाने शिक्षिकेला मारहाण करताच, दोन विद्यार्थी तिला वाचवण्यासाठी आले आणि त्यांनी त्या मुलाला पळवून लावले. इथे कोणीही वाचवण्यासाठी येत नाहीये, हे दुःखद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ मार्क्स कल्चर इतके विषारी झाले आहे की ९०% देखील “अपयश” वाटते. मग लोक विचारतात की मुले हिंसक का होत आहेत.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






