heatwave

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल राज्य, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विदर्भात हलका पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

  नवी दिल्ली : दिल्लीत शनिवारी 2.6 मिमी पावसाची नोंद झाली आणि दिवसभर जोरदार वारे वाहत होते. रविवारी किमान तापमान 23 अंश आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस होते. दोन दिवस कमाल तापमानात दररोज एक अंशाने वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. याशिवाय आठवडाभर पावसाची शक्यता नाही. अनेक राज्यांमध्ये वादळ, पाऊस, गारपीट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

  उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  उत्तराखंडमध्ये हवामान आल्हाददायक

  देहराडून, टिहरी, चमोली आणि रुद्रप्रयागमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस झाला. तर बद्रीनाथ आणि केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी झाली. त्यामुळे कमाल तापमानात तीन ते सहा अंश सेल्सिअसची घट झाली. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. डेहराडूनमध्ये सोमवारीही अंशतः ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.

  महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये अवकाळी

  सोमवारी हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल राज्य, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विदर्भात हलका पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

  बंगाल, ओडिशामध्ये ‘रेड अलर्ट’

  हवामान खात्यानुसार, उष्ण आणि दमट हवामानामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये दिवसाचे कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.