नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानं विश्वास बळावलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा याच्या जोडगोळीसाठी २०२३ हे साल अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपानं सुरु केली आहे. २०२४ साली पुन्हा बहुमतानं सत्तेत येण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा स्थितीत येणारं २०२३ हे साल अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, नितीश कुमार राष्ट्रीय पातळीवर सक्रिय होण्यासाठी करत असलेले प्रयत्न, आपच्या अरविंद केजरीवालांना राष्ट्रीय राजकारणाचे लागलेले वेध या सगळ्यात भाजपासमोर नव्या वर्षांत अनेक आव्हान असणार आहेत. आठ-नऊ वर्षांच्या एन्टी इक्मबन्सीचा फटकाही भाजपाला बसणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय.
नव्या वर्षांत १० राज्यांत विधानसभा निवडणुका :
नव्या वर्षांत १० राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या १० राज्यांतं ९३ लोकसभा मतदारसंघ आहेत. एकूण लोकसभेच्या जागांपैकी ते १७ टक्क्यांपर्यंत आहेत. त्यामुळं या १० राज्यांत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान मोदी-शाहा यांच्यासमोर असणार आहे. २०४७ पर्यंत भाजपाचीच सत्ता देशात राहील अशा विश्वास भाजपाचे धुरिण व्यक्त करत असले, तरी प्रत्यक्षात यासाठी मोठे प्रयत्न संघटनात्मक पातळीवर करावे लागणार असल्याचं सांगण्यात येतंय.
कोणत्या १० राज्यांत होणार आहेत निवडणुका :
२०२३ सालात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा या पाच मोठ्या राज्यांचा समावेश आहे. तर ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, मागालँड आणि मिझोरम या राज्यांतही निवडणुका होणार आहेत. यांच्यासह जम्मू-काश्मीरमध्येगी या वर्षी निवडणुका होण्याची शक्यता आहे.
या १० राज्यांत किती लोकसभा जागा :
२०२४ ट्या लोकसभा निवडणुकांसाठी ही सगळीच राज्ये भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या १० राज्यांत लोकसभेच्या १७ टक्के जागा येतात. पाहुयात कोणत्या राज्यात किती लोकसभा जागा आहेत
राजस्थान- २५
मध्यप्रदेश- २९
छत्तीसगड-११
कर्नाटक- २८
तेलंगणा- १७
जम्मू काश्मीर- ६
ईशान्यकडची राज्ये- ६
महाराष्ट्रातही महत्त्वाच्या निवडणुका :
राज्यातही मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सुमारे १५ महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या वर्षआत होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचा संघर्ष भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतोय. यासह पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांकडे पुञच्या वर्षात सगळ्यांच लक्ष असेल. मविआ विरकुद्धी शिंदे गट-भाजपा हा संघर्ष महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकांत विजय मिळवून लोकसभेसाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोषक वातावरण निर्मितीचा भाजपाचा प्रयत्न असेल.