भारताची ताकद वाढणार (फोटो- ani)
नवी दिल्ली: केंद्रातील सरकार गेल्या काही वर्षांपासून भारताच्या संरक्षण सिद्धतेवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अर्थसंकल्पामध्ये देखील संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. दरम्यान मेड इन इंडिया या तत्वावर भारताने भर दिल्याचे दिसून येते आहे. आता लवकरच भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार आहे. अमेरिका या अहिन्यात भारताला आणखी तीन अपाचे हेलिकॉप्टर देणार आहेत.
अमेरिका भारताला या महिन्यात तीन AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर देअर आहे. यामुळे भारताच्या वायुसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शत्रूराष्ट्र देखील आता भारताविरोधी कारवाया करताना घाबरतील इतके हे हेलिकॉप्टर तकडवाण आहे.
भारतीय वायुसेना सध्या 22 अपाचे हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. अजून 6 हेलिकॉप्टर भारताला मिळणार आहेत. त्यातील 3 या महिन्यात तर उर्वरित तीन हेलिकॉप्टर वर्षाच्या अखेरीस मिळणार आहेत.
अपाचे हेलिकॉप्टरमध्ये काय खास?
अपाचे हेलिकॉप्टर हे अत्याधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यामध्ये नाइट व्हीजन, मिसाईल्स सिस्टिम आणि आधुनिक रडार आहे. हे हेलिकॉप्टर कोणत्याही वातावरणात ऑपरेशन करण्यास सज्ज असणारे हेलिकॉप्टर आहे.यामध्ये 70 मीमी रॉकेट आणि ऑटोमेटिक मशीन गन बसवण्यात आलेली आहे. अचूक लक्ष्य साधणे हे या हेलिकॉप्टरचे विशेषण आहे.
भारतीय वायुदलात भरतीच्या संधी
भारतीय वायूदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘अग्निपथ योजना’ अंतर्गत अग्निवीर वायू इंटेक 1/2026 साठी भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून ११ जुलै २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळ agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. याअंतर्गत २५ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
भारतीय वायुदलात भरतीच्या संधी! ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ जानेवारी २००५ ते १ जानेवारी २००८ दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचे किमान वय १७.५ वर्षे, तर कमाल वय २१ वर्षे असावे. काही विशेष प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, अर्जदारांनी १२वी उत्तीर्ण असावे आणि भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. याशिवाय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्युटर सायन्स यासारख्या ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा घेतलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्याकडेही ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेले उमेदवारही पात्र आहेत, मात्र त्यामध्ये फिजिक्स, मॅथ्स व इंग्रजीत ५० टक्के गुण आवश्यक आहेत.