जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध दल सरोवरात हाऊसबोटला लागली आग; तीन पर्यटकांचा मृत्यू, आठ जणांची सुटका

दल सरोवराच्या घाट क्रमांक 9 जवळ एका हाऊसबोटला आग लागली, जी झपाट्याने पसरली आणि इतर हाऊसबोटलाही आग लागली.

    जम्मूकाश्मीर मधील प्रसिद्ध दल सरोवर पाहण्यासाठी जगभरातुन पर्यटक येतात. या दल सरोवर परिसरात असलेल्या एका हाऊसबोटला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत (Dal Lake houseboat fire) तीन पर्यटकांचा मृत्यू झाल असून आठ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ही सर्व पर्यटक  बांगलादेशचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

    नेमकं काय घडलं

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील दल सरोवरातील सफीना हाउसबोटमध्ये काही पर्यटक थांबले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास या हाऊसबोटला आग लागल्याने तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आणि आठ जणांना वाचवण्यात यश आले. मृत तीन्ही पर्यटक बांगलादेशी नागरिक होते.  अनिंदया कोशल, दास गुप्ता आणि मोहम्मद मोईनुद अशी त्यांची नावं आहेत.

    पोलिसांनी सांगितले की, दल सरोवराच्या घाट क्रमांक 9 जवळ एका हाऊसबोटला आग लागली, जी झपाट्याने पसरली आणि इतर हाऊसबोटलाही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.