दिल्ली मेट्रोच्या (Delhi Metro) आत मारामारी, नृत्य, गाणी आणि रील बनवणे अशा अनेक गोष्टी घडणं सामन्य बाब झाली आहे. रोज काही ना काही मेट्रोचे व्हिडिओ व्हायरल होतचं असतात. यापुर्वी अनेकदा मेट्रोमध्ये नाचताना आणि गातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेव्हा डीएमआरसीनेही काही नियम घालून दिले होते. तरीही या नियमांना प्रवासी काही जुमानत असल्याचं दिसत नाही आहे. लोक मेट्रो अद्यापही काही ना काही असं कृत्य करतात की ते चर्चेत येतं.
दिल्ली मेट्रोमध्ये राडा होणं आता काही नवीन राहिलेलं नाही. दिल्ली मेट्रोच्या नुकतात एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये दोन महिला वाईट पद्धतीने भांडताना दिसत आहेत. बहुधा सीटवरून हे भांडण झाले असावे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना चांगले-वाईट म्हणत आहेत. एकाने तर मेट्रो तुमच्या बापाची नाही, असेही म्हण्टले.
यासोबतच दोन महिलांमध्ये वादावादी हाणामारीमध्ये रुपातंरीत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर लोकांनी त्यावर भरभरून कमेंट करायला सुरुवात केली. आनंद घेताना एका यूजरने लिहिले – करिअरचा सल्ला… मेट्रोमध्ये कॅमेरा घेऊन मेट्रो व्लॉगर व्हा, खूप स्कोप आहे.’ दुसर्याने लिहिले- ‘मेट्रोमध्ये सर्व काही घडत आहे जे होऊ नये, हे लोक…’.
मेट्रोमध्ये घडणाऱ्या घटनांचे व्हिडिओ अनेकदा समोर येतात. यापूर्वीही मेट्रोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला होता. यानंतर एका महिलेने आरडाओरडा करत दुसऱ्या महिलेला मोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या महिलेचे बोलणे दुसऱ्या महिलेलाही राग येतो. ती म्हणते मी शूजने मारेन. प्रत्युत्तरात महिला म्हणाली, ‘शूटने मारू नका, बेल्टने मारू नका, गोळी मारा. बुटांचे युग गेले, ते बुलेटचे युग आहे, कोणत्या युगात जगत आहात.