Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प

Union Budget 2026 Live updates : सीतारामन सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. असे कामकाज करणाऱ्या त्या देशातील पहिल्याच अर्थमंत्री ठरतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 02, 2026 | 11:12 AM
Live Budget 2026: Finance Minister Nirmala Sitharaman on Union Budget 2026-27

Live Budget 2026: Finance Minister Nirmala Sitharaman on Union Budget 2026-27

Follow Us
Close
Follow Us:

Union Budget 2026 Live : केंद्र सरकारचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर करणार आहेत. रविवार असूनही निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देतील. यासोबतच देशाच्या संसदीय इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. सीतारामन सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. असे कामकाज करणाऱ्या त्या देशातील पहिल्याच अर्थमंत्री ठरतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.

मोदी सरकारने गुरुवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ सादर केले. या सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून येते की सरकार देशाची कर प्रणाली हळूहळू सुलभ, सोपी आणि सुधारित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मध्यमवर्गासाठी मोठी आयकर सवलत असो किंवा जीएसटी प्रणालीत बदल असो, या सर्वेक्षणातून असे सूचित होते की, भविष्यात कर भरणे सोपे होणार नाही तर ते कमी कर-केंद्रित देखील होईल.

The liveblog has ended.
  • 01 Feb 2026 05:35 PM (IST)

    01 Feb 2026 05:35 PM (IST)

    UGC वादाचा उडाला भडका!सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीने प्रशासकीय गोंधळ दूर

    उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या यूजीसी नियमांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे नियम १३ जानेवारी रोजी अधिसूचित करण्यात आले. न्यायालयाने म्हटले आहे की धोरणकर्ते हे विसरतात की चुकीच्या कल्पना असलेले सामाजिक न्याय कायदे समाजाचे विभाजन करू शकतात किंवा त्यात भांडणं लावू शकतात. २०१२ च्या यूजीसी नियमांचे पालन करण्याची संस्थांना सक्ती करून, सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय गोंधळ दूर केला आहे, ज्यामुळे सामाजिक एकतेवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळता आले आहेत.

    सविस्तर बातमीसाठी येथ क्लिक करा

  • 01 Feb 2026 05:15 PM (IST)

    01 Feb 2026 05:15 PM (IST)

    "...तर पार्थ पवारांना खासदार बनवणं चुकीचं,"अंजली दमानिया यांचे टीकास्त्र

    दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन (ajit pawar plane crash) झाले आहे. मुंबईहून बारामतीला येताना त्यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात झाल्याने अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांच्या आकस्मित निधनामुळे राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता होती. मात्र अवघ्या चार दिवसांमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    सविस्तर माहिती जाणून घेऊयात

  • 01 Feb 2026 03:50 PM (IST)

    01 Feb 2026 03:50 PM (IST)

    Kolhapur News : बहुजन शिक्षणापासून वंचितच

    कोल्हापूर :  पाटण, (प्र.) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आजही डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या दुर्गम भागातील धनगर व इतर बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत, ही अत्यंत दुर्दैवी आणि शोकांतिका असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड, तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कसणी (ता. पाटण), कोकीसरे गवळीनगर (ता. पाटण) तसेच खोदलापूर (ता. शिराळा) या दुर्गम भागांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व महिलांसाठी साडी, तसेच सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.

    वाचा सविस्तर

  • 01 Feb 2026 03:40 PM (IST)

    01 Feb 2026 03:40 PM (IST)

    ‘हे घृणास्पद कृत्य…’, शेफाली बग्गाने चहलसोबतच्या व्हायरल AI फोटोवर दिली प्रतिक्रिया

    इंटरनेटवर विनोद म्हणून सुरू झालेला हा प्रकार लवकरच वाढत गेला आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार शेफाली बग्गाला तो अजिबात आवडला नाही. भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या अफवांमध्ये अडकवणारे एआय-जनरेटेड पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, शेफालीने ते प्रसारित करणाऱ्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटावर आधारित या पोस्टर्समध्ये चहलला त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा, कथित माजी जोडीदार आरजे महवश आणि स्वतः शेफाली बग्गासोबत दाखवण्यात आले आहे. अनेकांनी याला मीम संस्कृतीचा भाग मानले असले, तरी शेफालीने स्पष्टपणे सांगितले की तिला यात काहीही मजेदार वाटले नाही.

    वाचा सविस्तर 

  • 01 Feb 2026 03:25 PM (IST)

    01 Feb 2026 03:25 PM (IST)

    Sports Budget 2026 : निर्मला सीतारमण यांनी क्रीडाप्रेमींची लावली लॉटरी!

    Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल आहे. या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की क्रीडा उपकरणे आता स्वस्त होणार आहेत.  ज्यामुळे खेळाडू आणि तरुणांना चांगल्या सुविधा उपभोगता येतील. ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागात क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एक मोठी योजना देखील त्यांनी जाहीर केली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 01 Feb 2026 03:20 PM (IST)

    01 Feb 2026 03:20 PM (IST)

    Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संशय

    Ajit Pawar : बारामती : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन (Ajit Pawar Plane Crash) झाले. 28 फेब्रुवारी रोजी मुंबईहून बारामतीला येतान त्यांच्या विमानाचा लँडिंग करताना अपघात झाला. यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. यानंतर विमान अपघात कसा झाला आणि त्यावेळी असणारी परिस्थितीवर यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संशय व्यक्त केला आहे.  अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजकीय महत्त्वाची व्यक्ती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या विमानाबाबत काळजी का घेण्यात आली नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन रोष व्यक्त केला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 01 Feb 2026 02:50 PM (IST)

    01 Feb 2026 02:50 PM (IST)

    अर्थमंत्र्यांची क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा! ‘खेलो इंडिया मिशन’ची करणार सुरुवात

    Union Budget 2026, Launch of Khelo India Mission : भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग ९ वा अर्थसंकल्प आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या असून  क्रीडा क्षेत्राबाबत देखील एक मोठी घोषणा केली आहे. आगामी दशकात भारताच्या क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया अभियान सुरू करण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून प्रस्ताव देण्यात अल आहे.

  • 01 Feb 2026 02:45 PM (IST)

    01 Feb 2026 02:45 PM (IST)

    कोल्हापुरकरांना मिळणार 5 वर्षात 6 महापौर! नेमकं काय आहे महायुतीचा फॉर्म्युला?

    कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत महायुतीकडून पुढील पाच वर्षांसाठी सत्तावाटपाचा स्पष्ट आणि सर्वसमावेशक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या सभापती पदांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य या घटक पक्षांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यामुळे महायुतीतील सर्व नगरसेवकांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • 01 Feb 2026 02:40 PM (IST)

    01 Feb 2026 02:40 PM (IST)

    AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण

    अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प 2026-27 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण, ऑटो, आरोग्यापासून विविध क्षेत्रात अनेक मोठे बदल केले जाणार आहे. या सर्वांसोबत अर्थमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी देखील काही घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारमण म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भुमिका पार पडू शकतात.

  • 01 Feb 2026 02:35 PM (IST)

    01 Feb 2026 02:35 PM (IST)

    सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढणार की दिलासा? काय स्वस्त, काय महाग?

    भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा Budget 2026 सादर केला. त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठमोठ्या घोषणा केला आहे. देशभरातील लोक या सरकारच्या बजेटवर लक्ष ठेवून होते. विशेषतः कोणती गोष्ट महाग आणि स्वस्त होईल? याकडे नागरिकांचे कटाक्षाने लक्ष होते.

  • 01 Feb 2026 02:30 PM (IST)

    01 Feb 2026 02:30 PM (IST)

    केंद्रीय अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल : देवेंद्र फडणवीस

    Union Budget 2026 News In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे २०२५ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, मोदी सरकार 3.0 चा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली जात आहे.

  • 01 Feb 2026 02:25 PM (IST)

    01 Feb 2026 02:25 PM (IST)

    ‘कोण बोललं हे’, Neelam ने गोविंदासह अफेअरबाबत केला अनेक वर्षांनी धक्कादायक खुलासा

    गोविंदा आणि नीलम कोठारी यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना भुरळ घातली. ९० च्या दशकात त्यांना एक हिट जोडी मानले जात असे. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या. गोविंदाने स्वतः कबूल केले की तो नीलमकडे आकर्षित झाला होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता. त्याने सुनीता आहुजासोबत लग्न करण्यासाठी त्याची साखरपुडाही तोडला. अलिकडेच एका मुलाखतीत नीलमने ९० च्या दशकात ऑनलाइन पसरलेल्या अफवांबद्दल उघडपणे सांगितले आणि सर्व दावे फेटाळून लावले.

  • 01 Feb 2026 02:20 PM (IST)

    01 Feb 2026 02:20 PM (IST)

    टियर-२, टियर-३ शहरांचा गेमचेंजर बजेट

    Union Budget 2026:  आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सातत्याने चालना देण्याच्या योजना जाहीर केल्या, विशेषतः ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना मुख्य लक्ष्य केले. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत की, टियर-२ आणि टियर-३ शहरे आता ‘विकास केंद्रे’ बनली आहेत.

  • 01 Feb 2026 02:14 PM (IST)

    01 Feb 2026 02:14 PM (IST)

    पोलिसांची कारवाई, ६ चोरटे सापडले तावडीत! तब्बल साडे ९ लाखांचा माल जप्त

    जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या घटनांनी नागरिक दहशतीत होते. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सात गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • 01 Feb 2026 02:06 PM (IST)

    01 Feb 2026 02:06 PM (IST)

    सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढणार की दिलासा? काय स्वस्त

    भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा Budget 2026 सादर केला. त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठमोठ्या घोषणा केला आहे. देशभरातील लोक या सरकारच्या बजेटवर लक्ष ठेवून होते. विशेषतः कोणती गोष्ट महाग आणि स्वस्त होईल? याकडे नागरिकांचे कटाक्षाने लक्ष होते.अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या घोषणेनंतर अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. यामुळे नक्कीच देशातील नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • 01 Feb 2026 01:45 PM (IST)

    01 Feb 2026 01:45 PM (IST)

    नारळाची शेती अन्…; बजेटमध्ये शेतीला ‘हे’ मिळालं

    नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. यामध्ये कृषी, शेतकऱ्यांसाठी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.

  • 01 Feb 2026 01:40 PM (IST)

    01 Feb 2026 01:40 PM (IST)

    इनकम टॅक्सपासून ते हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरपर्यंत, बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

    भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट 2026 सादर केला आहे. या बजेटमध्ये त्यांनी विविध क्षेत्रासंबंधित मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. बजेट सादर करताना त्यांनी एकापाठोपाठ घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा परिणाम सामान्य माणसापासून ते उद्योग, स्टार्टअप, एमएसएमई आणि पायाभूत सुविधा क्षेत्रापर्यंत सर्वांना होणार आहे. चला २०२६ च्या बजेटमधील प्रमुख घोषणांवर एक नजर टाकूया.

  • 01 Feb 2026 01:35 PM (IST)

    01 Feb 2026 01:35 PM (IST)

    चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार, तुमच्या खिशातले किती पैसे वाचणार?

    देशाचा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर होत आहे. विविध क्षेत्रात अर्थसंकल्प जाहीर झाला असून काही उद्योग क्षेत्रात वस्तू महागल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर चप्पल उद्योगातही निर्यात शुल्क कपात करण्यात आली असून चप्पल देखील आता स्वस्त होणार आहेत. देशात चप्पल उद्योग आणि कापड निर्मितीच्या व्यवसायाला शुक्ल कपात करण्यात आली आहे. या निर्णयाने देशी व्यवसायाला चालना मिळू शकते. 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 50 टक्के अमेरिकन शुल्काचा सामना करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी 1अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹8,400 कोटी) च्या मोठ्या समर्थन पॅकेजसह पादत्राणे क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामध्ये कच्च्या मालावर आणि विशेषतः शू अपरवर लक्ष केंद्रित केले जाईल.

  • 01 Feb 2026 01:26 PM (IST)

    01 Feb 2026 01:26 PM (IST)

    दारूला लागला ब्रेक! तळीरामांसमोर दारू कशी प्यायची प्रश्न

    नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान या बजेटमुळे तळीरामांसमोर मोठी चिंता उभी राहिली आहे.

  • 01 Feb 2026 01:00 PM (IST)

    01 Feb 2026 01:00 PM (IST)

    चीनला थेट आव्हान! अर्थसंकल्पात ‘दुर्मिळ पृथ्वी मिशन’ची घोषणा

  • 01 Feb 2026 12:30 PM (IST)

    01 Feb 2026 12:30 PM (IST)

    Union Budget: निर्मला सीतारमण यांचे भाषण समाप्त

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026 - 27 सादर करत पहिल्याच दिवशी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी आता त्यांचे भाषण संपवले असून संपूर्ण कामकाज पुन्हा उद्या सुरु केले जाईल.

  • 01 Feb 2026 12:26 PM (IST)

    01 Feb 2026 12:26 PM (IST)

    Union Budget: चुकीच्या पद्धतीने उत्पन्न नोंदवणाऱ्यांना कडक शिक्षा

    २०२६ चा उत्पन्न कर अर्थसंकल्प: सरकार त्यांचे उत्पन्न चुकीच्या पद्धतीने नोंदवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. जर करदात्याने त्यांचे उत्पन्न चुकीचे सादर केले किंवा लपवले तर त्यांना कराच्या रकमेच्या १००% पर्यंत दंड आकारला जाईल असे अर्थसंकल्पात नमूद केले आहे. मनीकंट्रोलच्या पीएफ संपादक टीना जैन कौशल यांच्या मते, कर अनुपालन मजबूत करण्यासाठी आणि जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल देण्यास आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कर प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि प्रामाणिक करदात्यांचा विश्वास राखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

  • 01 Feb 2026 12:25 PM (IST)

    01 Feb 2026 12:25 PM (IST)

    Union Budget: आयटी क्षेत्राला मोठी चालना

    २०२६ चा उत्पन्न कर अर्थसंकल्प: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी-सक्षम सेवा, केपीओ आणि कंत्राटी संशोधन आणि विकास सेवांमध्ये भारताला जागतिक स्तरावरील आघाडीचे म्हणून मान्यता मिळाली आहे. आता या सर्वांचा समावेश एकाच श्रेणीत केला जाईल.

  • 01 Feb 2026 12:23 PM (IST)

    01 Feb 2026 12:23 PM (IST)

    Union Budget: महिलांसाठी केली मोठी घोषणा

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी समुदायाच्या मालकीच्या रिटेल स्टोअर्स म्हणून SHE (स्वयंसेवा उद्योजक) मार्टची स्थापना केली जाणार आहे.

  • 01 Feb 2026 12:21 PM (IST)

    01 Feb 2026 12:21 PM (IST)

    Union Budget: सौर उर्जेसंबंधीत उपकरणे स्वस्त होणार

    सौर उर्जेसंबंधीत उपकरणे स्वस्त होणार. कॅन्सरच्या 17 औषधांवरील आयातशुल्कात कपात करण्यात आली आहे. चामडे आणि कापड उद्योगावरील निर्यात शुल्कात कपात करण्यात आली आहे.

  • 01 Feb 2026 12:18 PM (IST)

    01 Feb 2026 12:18 PM (IST)

    Union Budget: शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंग करात वाढ

    अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे की, शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगच्या करात वाढ करण्यात आली आहे. ऑप्शन ट्रेडिंगवरील कर वाढीमुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे.

  • 01 Feb 2026 12:16 PM (IST)

    01 Feb 2026 12:16 PM (IST)

    Union Budget: डेटा सेंटर तयार करणाऱ्या कंपन्यांना सूट

    2047 पर्यंत टॅक्स होलीडे दिला जाणार आहे. जर डेटा सेंटर भारतात तयार करण्यात आले तर विदेशी कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. कारण डेटा सेंटर तयार करणाऱ्या कंपन्यांना सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

     

     

  • 01 Feb 2026 12:14 PM (IST)

    01 Feb 2026 12:14 PM (IST)

    Union Budget: अघोषित संपत्तीवर दंड नाही

    छोटे कर चुकवल्यास आता शिक्षा मिळणार नसून याबाबत दंड आकारले जाणार आहेत. तर अघोषित संपत्तीवर दंड नाही तर कर भरण्याची तरतूद करण्यात आली आहे.

  • 01 Feb 2026 12:10 PM (IST)

    01 Feb 2026 12:10 PM (IST)

    Union Budget: यंदाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी ‘या’ विशेष तरतुदी!

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आपला सलग ९वा अर्थसंकल्प सादर केला. २०२६-२७ चा हा अर्थसंकल्प भारताला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने शिक्षण, एआय (AI) आणि कौशल्य विकासाला केंद्रस्थानी ठेवले असून, तरुणांच्या आकांक्षांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडताना सरकारची तीन मुख्य कर्तव्ये सांगितली: १. आर्थिक वृद्धीला वेग देणे आणि जागतिक अस्थिरतेत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणे. २. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे. ३. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संसाधने पोहोचवणे.

  • 01 Feb 2026 12:08 PM (IST)

    01 Feb 2026 12:08 PM (IST)

    Union Budget: 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार

    1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणा. अपघात विमा करमुक्त असेल. आयकर भरणे आता अधिक सुटसुटीत होणार.
    अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त असणार आहे.

  • 01 Feb 2026 12:05 PM (IST)

    01 Feb 2026 12:05 PM (IST)

    Union Budget: इनकम टॅक्सबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा

    आत्मनिर्भर भारतासाठी 2000 हजार करोड रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय इनकम टॅक्स फॉर्म अधिक सोपा केला जाणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन कायदा लागू केला जाणार आहे. सुधारित आयटीआर 31 मार्चपर्यंत दाखल करता येईल.

  • 01 Feb 2026 12:01 PM (IST)

    01 Feb 2026 12:01 PM (IST)

    Union Budget: चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ४.४ टक्के

    चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ४.४ टक्के राहिल. पुढील आर्थिक वर्षात वित्ती तूट ४.३ टक्के राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • 01 Feb 2026 11:58 AM (IST)

    01 Feb 2026 11:58 AM (IST)

    Union Budget: इशान्य राज्यातील बुद्धांशी निगडीत पर्यटनस्थळे विकसित करणार

    इशान्य राज्यातील बुद्धांशी निगडीत पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. मंदिरे, पर्यटन केंद्र विकसित करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. १६ व्या वित्त आयोगानुसार १ कोटीहून अधिक निधी देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

  • 01 Feb 2026 11:57 AM (IST)

    01 Feb 2026 11:57 AM (IST)

    Union Budget: दिव्यांग सहारा योजनेची घोषणा

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिव्यांग सहारा योजनेची घोषणा केली आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिकांसाठी नवीन खरेदी केंद्रे उभारली जाणार आहेत. लखपती दीदीसाठी नवीन पावलं टाकणार. दिव्यांगजनांना अधिक सक्षम करण्यासाठी नवीन योजनांची घोषणा केली जात आहे.

  • 01 Feb 2026 11:54 AM (IST)

    01 Feb 2026 11:54 AM (IST)

    Union Budget: जिल्हा रुग्णालय अपडेट होणार

    जिल्हा रुग्णालये अपडेट केले जाणार आहेत. देशातील जनतेला फायदा व्हावा यासाठी आपत्कालीन वॉर्डचा विस्तार केला जाणार आहे. 

    
    
  • 01 Feb 2026 11:52 AM (IST)

    01 Feb 2026 11:52 AM (IST)

    Union Budget: चंदन, शेंगदाणे आणि बदाम वर अर्थमंत्री काय म्हणाल्या?

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय मजबूत करायचा आहे. कृषी क्षेत्रात उत्पादनांची विविधता वाढविण्यासाठी आणखी सवलती दिल्या जाणार आहेत. 1 कोटी शेतकरी नारळी शेतावर अंवलंबून आहेत. मत्सव्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार. नारळ संशोधन केंद्राची स्थापना करणार. 500 एकात्मिक मत्स्य केंद्रे स्थापन करणार.

  • 01 Feb 2026 11:50 AM (IST)

    01 Feb 2026 11:50 AM (IST)

    Union Budget History: कसे होते देशाचे पहिले बजेट?

    आज भारताचा २०२६-२७ वित्तीय वर्षाचा अर्थ संकल्प म्हणजेच युनिअन बजेट सादर करण्यात येणार आहे. देशाचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे हे संकल्प सादर करण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? देशाचा पहिला बजेट १८६० मध्ये एका स्कॉटीश अर्थतज्ज्ञाने सादर केला होता. पण देशाचा खरा अर्थसंकल्प स्वतंत्र्यानंतर १९४७ साली, R.K. Shanmukham Chetty यांनी सादर केला. त्या कालचा बजेट आणि आताच्या काळातील बजेटमध्ये फार मोठा फरक आहे, कारण दोन्ही बजेटमागील उद्देश फार वेगळा होता.

  • 01 Feb 2026 11:48 AM (IST)

    01 Feb 2026 11:48 AM (IST)

    Union Budget: खेलो इंडिया मिशनची घोषणा

    दशकभरासाठी खेलो इंडिया मिशनची घोषणा करण्यात आली आहे. खेलो इंडिया मिशनद्वारे क्रिडा क्षेत्रांच रुप बदलून टाकणार. क्रिडा प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षक स्पर्धा भरवणार. नवीन क्रिडा संकुले उभारणार.

  • 01 Feb 2026 11:46 AM (IST)

    01 Feb 2026 11:46 AM (IST)

    Union Budget: 95 देशांची कॅट परिषद भारतात भरणार

    नवीन सांस्कृतिक केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. 95 देशांची कॅट परिषद भारतात भरणार आहे. सरकारचे प्रमुख आणि मंत्री कॅट परिषदेत सहभागी होतील.

  • 01 Feb 2026 11:45 AM (IST)

    01 Feb 2026 11:45 AM (IST)

    Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट?

    आगामी अर्थसंकल्पात भारतातील वाढत्या वैद्यकीय महागाई आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमपासून लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री या संदर्भात काही घोषणा करण्याची अपेक्षा आहे. वैद्यकीय महागाईमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक दबाव वाढला आहे. रुग्णालयातील वाढत्या बिलांचा आणि उच्च प्रीमियमचा आता अनेक कुटुंबांच्या बचत आणि दीर्घकालीन आर्थिक योजनांवर परिणाम होत आहे. परिणामी, विमा नियामकाकडून मागण्या आहेत.

  • 01 Feb 2026 11:45 AM (IST)

    01 Feb 2026 11:45 AM (IST)

    Union Budget: देशातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतीगृह

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे की, उच्च शिक्षण संस्थांसाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतीगृहाची स्थापना केली जाणार  आहे.

  • 01 Feb 2026 11:43 AM (IST)

    01 Feb 2026 11:43 AM (IST)

    Union Budget: 20 पर्यटन केंद्रांवर 10 हजार गाईड्स

    20 महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांवर 10 हजार गाईड्स निर्माण करणार. डिझाईन क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्या संस्था स्थापन करणार.

  • 01 Feb 2026 11:41 AM (IST)

    01 Feb 2026 11:41 AM (IST)

    Union Budget: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी स्थापन करणार

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे की, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी स्थापन करणार. 5 विद्यापीठ टाऊनशिप उभारणार.

  • 01 Feb 2026 11:38 AM (IST)

    01 Feb 2026 11:38 AM (IST)

    Union Budget: मुंबईत एबीजीसीची कंटेट क्रिएटर लॅब उभारणार

    मुंबईत एबीजीसीची कंटेट क्रिएटर लॅब उभारणार आहे. पशुवैद्य कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसह्याय केलं जाणार.

  • 01 Feb 2026 11:36 AM (IST)

    01 Feb 2026 11:36 AM (IST)

    Union Budget: भारताला मेडिकल ट्युरिझम बनवणार

    भारताला मेडिकल ट्युरिझम बनवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब स्थापन केले जाणार आहेत. आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या 3 नवीन संस्था स्थापन करणार.

  • 01 Feb 2026 11:35 AM (IST)

    01 Feb 2026 11:35 AM (IST)

    Union Budget 2026: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातून भारताला सावरण्याचा मोदींचा प्रयत्न

    Union Budget 2026: मोदी सरकारचा १५ वा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला बाह्य दबाव आणि अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत असताना हे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. वाढत्या जागतिक भूराजकीय तणाव, काही भारतीय उत्पादनांवर अमेरिकेने लादलेले अतिरिक्त कर आणि महसुली दबाव यांच्या दरम्यान, सरकारसमोर आर्थिक वेग राखण्याचे आणि वित्तीय संतुलन साधण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.

  • 01 Feb 2026 11:34 AM (IST)

    01 Feb 2026 11:34 AM (IST)

    Union Budget: शिक्षण ते रोजगार यासाठी उच्चस्तरिय समित्या

    शिक्षण ते रोजगार यासाठी उच्चस्तरिय समित्या स्थापन करणार. विविध क्षेत्रांत तरूणांच्या विकासकौशल्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करणार.

  • 01 Feb 2026 11:32 AM (IST)

    01 Feb 2026 11:32 AM (IST)

    Union Budget: पीआरओआयला भारतात गुंतवणूकीची मंजूरी

    पीआरओआयला भारतात गुंतवणूकीची मंजूरी देण्यात आली आहे. पीआरओआयला 24 टक्क्यांपर्यंत गुंतवणूकीची मंजूरी दिली आहे.

  • 01 Feb 2026 11:30 AM (IST)

    01 Feb 2026 11:30 AM (IST)

    Union Budget: भांडवली खर्च वाढवण्याची घोषणा

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात भांडवली खर्च वाढवण्याची घोषणा केली आहे. भांडवली खर्च आता १२.२० लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. त्यांनी सांगितसं आहे की, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटसाठी 40 हजार करोड दिले जाणार आहेत.

  • 01 Feb 2026 11:30 AM (IST)

    01 Feb 2026 11:30 AM (IST)

    Union Budget 2026 : सामान्य माणसाला काय मिळणार?

    तुम्हाला वाटत असेल की सरकार रस्ते, रेल्वे किंवा शिक्षणावर सर्वाधिक खर्च करते, तर तुम्ही चुकीचे आहात. सरकारी खर्चाचा सर्वात मोठा भाग हा ‘व्याज देयके’ (Interest Payments) आहे. २०२४-२५ मध्ये हा खर्च एकूण बजेटच्या २४% होता, जो २०२५-२६ मध्ये २५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की, सरकार जो प्रत्येक १ रुपया खर्च करते, त्यातील चक्क २५ पैसे हे केवळ मागील वर्षांत घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी जातात. हा पैसा कोणतीही नवीन मालमत्ता किंवा नोकऱ्या निर्माण करत नाही.

Web Title: Union budget india 2026 27live updates india finance minister nirmala sitharaman at parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • FM Nirmala Sitharaman
  • union budget 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.