अंजली दमानिया यांचा पार्थ पवार यांना राज्यसभा खासदार आणि धनंजय मुंडेंना मंत्री करण्याला विरोध आहे (फोटो - सोशल मीडिया)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता. राजकीय विरोध असला तरी ही घटना मनाला चटका लावणारी असल्याचे देखील दमानिया म्हणाल्या होत्या. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे दमानिया यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पार्थ पवार आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला महत्त्वपूर्ण सवाल
अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, “अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही. १. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा. आणि २. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा. पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरतांना दिसले. संधीसाधू माणूस. परत येण्याची तडफड दिसतेय,” अशी घणाघाती टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही. १. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा.
२. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा. पार्थ पवारांवर चौकशी सुरू… — Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2026
हे देखील वाचा : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन
सुनेत्रा पवार यांना अजित पवारांकडे असणारी सर्व खाती देण्यात आली फक्त अर्थ खाते देण्यात आले नाही. यावरुन माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष झाली की, भाजपाला शिंदे गटाचीही आवश्यकता राहणार नाही आणि मग त्यांनाही बाजूला सारले जाईल, एकूणच, हा सर्व प्रकार लोकशाहीला घातक असून महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे,” अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.






