भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर..., ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना पुन्हा धमकी दिली आहे.अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेत बनले पाहिजेत. भारतात किंवा इतर कोणत्याही देशात बनवून अमेरिकेत विक्री होत असेल तर २५% कर भरावा लागेल, असा इशारा दिला आहे. “मी अॅपलचे टिम कुक यांना खूप दिवसांपूर्वी सांगितले होते की, अमेरिकेत विकले जाणारे त्यांचे आयफोन भारतात किंवा कोणत्याही देशात न बनवता अमेरिकेत बनवले जातील अशी मला अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात कुक यांनी गेल्याच आठवड्यात भारतात अॅपलचा प्लांट उभारू नये असं सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच धकमी देण्यात आली आहे. “काल मला टिम कुकसोबत थोडीशी समस्या होती. ते संपूर्ण भारतात उत्पादन करत आहेत. तुम्ही भारतात उत्पादन करावं असं मला वाटत नाही. अॅपल त्यांचे बहुतेक आयफोन चीनमध्ये बनवते आणि अमेरिकेत स्मार्टफोनचे उत्पादन करत नाही. मार्चपर्यंतच्या १२ महिन्यांत, अॅपलने भारतात २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन असेंबल केले, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सुमारे ६०% वाढ झाली.
अॅपल त्यांच्या देवनहल्ली प्लांटमध्ये २.५६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. हे प्लांट देवनहल्लीतील दोड्डागोल्लाहल्ली आणि चप्परादहल्ली गावात पसरले आहेत. जे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३४ किमी अंतरावर आहे. या वर्षी डिसेंबर २०२५ पर्यंत १००,००० आयफोन उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे.एस अँड पी ग्लोबलच्या मते, २०२४ मध्ये अमेरिकेत आयफोनची विक्री ७५.९ दशलक्ष युनिट्स होती, ज्यापैकी मार्चमध्ये भारतातून निर्यात ३१ लाख युनिट्स होती. इतकेच नाही तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिलमध्ये घोषणा केली होती. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात झाले.
ओव्हल हाऊसमध्ये रंगले राजकीय युद्ध ; ‘या’ नेत्यांसोबत डोनाल्ड ट्रम्प यांची झाली शाब्दिक चकमक
तैवानची कंपनी फॉक्सकॉन आणि भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारतात अॅपल आयफोन बनवतात. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच कंपनीच्या तिमाही निकालांनंतर सांगितले की जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतात बनवले जातील. कारण अॅपल देखील त्यांची पुरवठा साखळी चीनपासून दूर हलवत आहे.