जॉर्ज सोरोस अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित; PM नरेंद्र मोदींवर केली होती टीका
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये १९ जणांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो. सन्मानित व्यक्तींमध्ये उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या नावाचा देखील समावेश आहे. मागील काही वर्षांपासून भारतीय राजकारणात सोरोस यांचं नाव चर्चेत राहिलं आहे.
72 तासांत 94 हवाई हल्ले, 184 जणांचा मृत्यू; इस्त्रायलचा गाझामध्ये कहर
उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यावरून सत्ताधारी भाजपने विरोधी पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधला आहे. सोरोस यांना आता अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार सोरोस यांना देण्यात आल्याने त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोरोस यांच्यावतीने त्यांचा मुलगा अॅलेक्सने हा पुरस्कार स्वीकारला. सोरोस यांच्यासोबतच अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन, फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी, फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अभिनेता डेन्झेल वॉशिंग्टन यांच्यासह इतर काही व्यक्तींचा देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
जॉर्ज सोरोस यांनी 2023 मध्ये म्युनिचमधील संरक्षण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. सीएए आणि कलम 370 हटवण्यावरूनही त्यांनी टीका केली होती. त्यानंतर भाजपकडून सातत्याने सोरोस यांच्यावर निशाणा साधला जात आहे. जॉर्ज सोरोस यांना पुरस्कार देण्याचे कारण सांगताना व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, जॉर्ज सोरोस यांनी लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय मजबूत करणाऱ्या जगभरातील संस्थांना पाठिंबा दिला आहे.
बर्फाच्या वादळाचा अमेरिकेत कहर; 6 कोटी लोक होणार बाधित, अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर
जॉर्ज सोरोस अमेरिकन उद्योजक असून त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1930 रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी रेल्वे पोर्टर आणि वेटर म्हणूनही काम केले. त्यानंतर ते शेअर मार्केटकडे वळले. यातूनच त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली.
1979 मध्ये त्यांनी ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली असून ही संस्था विविध देशांमध्ये कार्यरत आहे. 1999 मध्ये पहिल्यांदा या संस्थेने भारतात प्रवेश केला. ओपन सोसायटी फाउंडेशन या संस्थेद्वारे औषधोपचार, न्याय व्यवस्था सुधारणाऱ्या आणि अपंग लोकांना मदत करणाऱ्या इतर संस्थांना निधी पुरवला जात होता. मात्र, नंतर निधी देण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसंच अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक फंड देणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. तसेच, त्यांना डावे विचारसरणीचे उद्योगपती म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे अनेक देशातील उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातो.