बिहार मध्ये व्हेटर्नरी कॉलेज ग्राउंड मतदान केंद्रावर गोंधळ दोम महिलांना वोटिंग स्लीप नसल्याने मतदानापासून वंचित ठेवण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पाटणा येथील व्हेटर्नरी कॉलेज ग्राउंड मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे दिसून आले. दोन महिलांना मतदान करू देण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला केला. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेया नावाच्या महिलेने निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे तिला मतदान करता आले नसल्याचे सांगितले. श्रेया म्हणाली की, “बीएलओने मला माझी मतदार स्लिप दिली नाही आणि आता ते म्हणत आहेत की ती माझी चूक आहे. त्यांनी मला ती डिजिटल पद्धतीने डाउनलोड करायला सांगितली, पण इथे ते आग्रह धरत आहेत की ती प्रत्यक्ष दाखवावी लागेल. मला आज स्लिप देण्यात आली नाही, मला का ते देखील माहित नाही. आता उशीर होत आहे, म्हणून मी जात आहे. मी इथे मतदान करण्यासाठी आले होते, पण बिहारमध्ये प्रत्येक वेळी अशा प्रकारचा गोंधळ होतो.” असा आरोप या त्रस्त महिलेने केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अनुपमा शर्मा या आणखी एका महिला मतदारानेही बिहार निवडणुकीबाबत असाच आरोप केला. तिने सांगितले की, ती घरकाम सोडून मतदान करण्यासाठी गेले होते. पण मतदान करू शकले नाही. सदर महिलेकडे स्लिप नाही पण तिला तिचा मतदार क्रमांक माहित आहे. तिच्याकडे ओळखपत्र देखील आहे. पण मतदान अधिकाऱ्याने स्लिप मागितली. तिने सांगितले की बीएलओने तिला स्लिप दिली नाही. ती ती व्हॉट्सअॅपवर पाठवेल असे तिने सांगितले. आज डिजिटल युगातही स्लिपची मागणी केली जात आहे. ती दाखवूनही तिला मतदान करू दिले जात नाही. येथे लोकांना स्लिपशिवाय मतदान करण्यापासून रोखले जात आहे. याप्रकरणी निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधला असता, दोन्ही प्रकरणे निकाली निघाल्याचे सांगण्यात आले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा






