मणिपुरात पुन्हा उफाळला हिंसाचार; हमार-झोमी समुदायात संघर्ष (फोटो सौजन्य-X)
इम्फाळ : मणिपूरमध्ये मागील काही महिन्यात प्रचंड हिंसाचार सुरु होता. पण काही कालावधीनंतर हा हिंसाचार थांबला होता. असे असताना आता पुन्हा एकदा येथे हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये हा हिंसाचार झाल्याचे पाहिला मिळाले. यामध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
झोमी-हमार जमातींमधील संघर्षामुळे हा हिंसाचार घडला. यादरम्यान रुग्णालयावरही हल्ले झाले, ज्यामुळे बुधवारी शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. रविवारी संध्याकाळी हमार आयएनपीयूआयचे सरचिटणीस रिचर्ड हमार यांच्यावर हल्ला झाला. तेव्हापासून दोन्ही जमातींमध्ये तणाव वाढला होता. जिल्हा प्रशासनाने परिसरात कलम 144 लागूही केले होते. पण, नंतर ह्मार इनपुई आणि झोमी कौन्सिलमध्ये समेट होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर जिल्हा प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले.
हेदेखील वाचा : Disha Salian Case : ‘दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकरांनी दबाव आणला’; वडिलांचे गंभीर आरोप, राज्यात खळबळ
याशिवाय, मणिपूरमध्ये दोन्ही संघटनांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचे मान्य केले होते. मात्र, झोमी गटाचा ध्वज काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे पुन्हा वाद सुरू झाले. जमावाने दगडफेक सुरू केली. पोलिसांना हवेत अश्रुधुराच्या नळकांड्या आणि गोळ्या झाडाव्या लागल्या. गर्दीतील काही लोकांनी गोळ्या झाडल्याचेही पोलिसांनी सांगितले. या हिंसाचारात मारल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव लालरोपुई पखुमते असे आहे. त्याला कोणी गोळी मारली याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
रुग्णालयावर हल्ला
चुराचांदपूर जिल्हा रुग्णालयावरही जमावाने हल्ला केला. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, रात्री नऊच्या सुमारास काही शस्त्रधारी लोक रुग्णालयात घुसली. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना धमकावले. रात्री अकराच्या सुमारास सुरक्षा दल आल्यानंतर परिस्थिती काहीशी सामान्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : “महाराष्ट्रात अवैधपणे राहणारे आणि घुसखोरी….”; गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी विधानसभेत नेमके काय सांगितले?