File Photo : Manipur violence
इम्फाळ : मणिपूरमधील जातीय हिंसाचारग्रस्त (Manipur Violence) कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायात झालेल्या गोळीबारात रविवारी एक जण ठार आणि तीन जखमी झाले. शेजारच्या कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातील अनेक बंदूकधाऱ्यांनी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुकवर हल्ला केला. सीमावर्ती गावात तैनात ग्रामीण स्वयंसेवकांनी प्रत्युत्तराची कारवाई केली. ते म्हणाले, हळूहळू शेजारच्या कडंगबंद आणि सेंजम चिरांग गावात गोळीबार होऊ लागला.
गेल्या वर्षी 3 मे रोजी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून, कौत्रुक गावात दोन समुदायांच्या ग्राम स्वयंसेवकांमध्ये गोळीबार झाल्याच्या बातम्या येत आहेत. इम्फाळ खोऱ्यात राहणारे मैतेई आणि शेजारच्या डोंगराळ प्रदेशात राहणारे कुकी यांच्यात गेल्या वर्षी 3 मे रोजी सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो लोक बेघर झाले आहेत.
दरम्यान, कांगपोकपी जिल्हा-आधारित ‘कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ ने या हत्येचा निषेध केला. असून 28 एप्रिल रोजी दुपारपासून जिल्ह्यात 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे.
महिला, मुलांना नेले सुरक्षितस्थळी
पोलिसांनी सांगितले की, एका गटातील 12 जणांनी एकाच वेळी डोंगराळ भागातून गावावर गोळीबार केला. त्यांनी मोर्टारही डागले. प्रत्युत्तरात गावकऱ्यांनीही गोळीबार केला. घरांवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला आणि मुलांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. मैतेई समुदायाची मागणी आहे की त्यांना एसटीचा दर्जा द्यावा. समाजाने यासाठी मणिपूर हायकोर्टात याचिका दाखल केली.
मणिपूर 1949 मध्ये भारतात विलीन झाल्याचा या समुदायाचा युक्तिवाद होता. त्याआधी त्यांना एसटीचा दर्जा मिळाला होता. यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला शिफारस केली की, मैतेई यांचा अनुसूचित जमातीत (एसटी) समावेश करण्यात यावा.