नवी दिल्ली – तिहार जेलमध्ये (Tihar Jail) अटक असलेले दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांचा जेलमधील व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. यात जैन एका बेडवर झोपलेले असून एक व्यक्ती त्यांची मसाज (Massage) करताना दिसून येत आहे. या संबंधीचे तीन व्हिडिओ सद्या व्हायरल झालेले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपने (BJP) आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भाजपचे प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला, ते म्हणाले की, आप सरकार जेलमध्ये नियमांचे उल्लंघन करित आहे. शिक्षा होण्याऐवजी मंत्री सत्येंद्र जैन यांना व्हिआयपी सेवा दिली जात आहे. गुजरात निवडणुकीत आप पक्षाच्या वतीने प्रचारात प्रामाणिकपणाचे भांडवल करित आहे. मात्र भाजपच्या आरोपांनाही बळ मिळणार आहे.
सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात अनेक सुविधा मिळत असल्याचे ईडीने म्हटले होते. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पाठ आणि पायाची मालिश करताना दिसत आहे. कारागृह अधीक्षक नियमाविरुद्ध जाऊन सत्येंद्र जैन यांना भेटतात. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सत्येंद्र जैन यांच्यासाठी दररोज त्यांच्या घरून जेवण आणले जाते. त्यांची पत्नी पूनम जैन अनेकदा त्यांना सेलमध्ये भेटायला येते, हे चुकीचे आहे. या खटल्यातील इतर आरोपींसोबत तो तासनतास त्याच्या सेलमध्ये बैठक घेतात. सत्येंद्र जैन तुरुंगमंत्री असल्याचा चुकीचा फायदा घेत आहेत.
तिहार प्रशासनाने आरोप फेटाळले
तिहार प्रशासनाने सांगितले की, ईडीने आप नेते सत्येंद्र जैन यांच्या सेल आणि वॉर्डचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते, जे एजन्सीला प्रदान करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांच्या कक्षात बाहेरून कोणी येत नाही. सकाळी कैद्यांच्या मतमोजणीसाठी कक्ष उघडल्यावर वॉर्डात उपस्थित असलेले सर्व कैदी एकमेकांशी बोलू शकतात. दरम्यान, सत्येंद्र या प्रकरणातील इतर आरोपींसोबत बैठक घेतात. जेल प्रशासनाने सेलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट असल्याचा नकार दिला आहे.






