वक्फ दुरुस्ती विधेयक संयुक्त बैठकीत झालेल्या वादात TMC चे खासदार जखमी झाले आहेत.
वक्फ दुरुस्ती विधेयक संयुक्त समितीच्या JPC बैठकीत पुन्हा राडा पहायला मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) कल्याण बनर्जी आणि BJP चे अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात टोकाचा वाद झाला. बैठकीदरम्यान दोन्ही नेते आक्रमक झाले. या वातात कल्याण बनर्जीच्या टेबलावरची काचेची बाटली पडली. यात कल्याण बनर्जीच्या हाताला दुखापत झाली. सूत्रांच्या माहितीनुसार ओडिशाच्या एका संघटनेचे सदस्य त्यांची बाजू मांडत होते. त्यावेळी हा राडा झाला आहे.
#WATCH | Delhi: Meeting of the JPC (Joint Parliamentary Committee) on the Waqf Bill begins at the Parliament Annexe. It was halted briefly after a scuffle broke out during the meeting.
According to eyewitnesses to the incident, TMC MP Kalyan Banerjee picked up a glass water… pic.twitter.com/vTR7xMwOb5
— ANI (@ANI) October 22, 2024
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी जस्टिस इन रिॲलिटी, कटक, ओडिशा आणि पंचसखा प्रचार बनी मंडळी, कटक, ओडिशा यांचे सादरीकरण सुरू होते. मात्र कल्याण बॅनर्जी यांना त्याचवेळी आपलं मत मांडायचं होतं. त्याच्याशी आधीच तीनदा बोलणे झाले होते आणि प्रेझेंटेशन दरम्यान त्याला आणखी एक संधी मिळायची होती. त्यावर भाजप खासदार अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण बनर्जी यांनी अभिजीत गंगोपाध्याय यांच्याबद्दल अपशब्द वापरले. पण तृणमूल कॉंग्रेसनेही सोमोरून अपशब्द वापरल्याचा दावा केला आहे. कल्याण बनर्जींनी तिथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून टेबलावर आपटली. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र भाजने कल्याण बनर्जी यांनी फूटलेली बाटली अध्यक्षांच्या दिशेने फेकली, फेकल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे बैठक काही काळासाठी स्थगित करण्यात आली.
सोमवारी देखील बैठकीत असाच गोंधळ पहायला मिळाला होता.अल्पसंख्यक मंत्रालयाच्या प्रेझेंटेशनदरम्यान सत्ताधारी BJP आणि NDA सदस्यांमध्ये आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये टोकाचा वाद पहायला मिळाला. वक्फ दुरुस्ती विधेयक केवळ राजकीय हेतूतून आणि मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आणण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावेळी BJP आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये वादळी चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला वक्फ विधेयकाच्या प्रस्तावांवर असदुद्दीन ओवैसी यांनी JPC समोर सुमारे 1 तास म्हणणं मांडलं. यावेऱळीही ओवैसी आणि भाजपच्या खासदारांमध्ये वाद झाला.