दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचा सर्वात जवळचे सीसीव्हीटी व्हिडिओ व्हायरल झाले आहे(फोटो - सोशल मीडिया)
Delhi Blast Video :नवी दिल्ली: लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये 09 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. गर्दीच्या ऐन ठिकाणी आणि गजबजलेल्या वेळेमध्ये हा स्फोट करण्यात आला. यामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या शरीराचे तुकडे लांबपर्यंत फेकले गेले. यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला असून सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, दिल्ली बॉम्बस्फोटाचा सर्वात जवळचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
एका आय-20 कारमध्ये असलेल्या स्फोटकांच्या साहाय्याने हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले आहे. याबाबत बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घटनेबाबत निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून तपासयंत्रणांनी स्फोटाचे अनेक धागेदोरे शोधून काढले आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्सचा समावेश आढळून आला आहे. चालत्या गाडीमध्ये हा स्फोट झाला असून याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर दिल्ली बॉम्बस्फोटातील नवा व्हिडिओ समोर आला. यापूर्वी या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. मात्र यामध्ये प्रत्यक्ष बॉम्बस्फोटाची घटना दिसून येत नव्हती. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या लोकांचे भयभीयत झालेले व्हिडिओ आणि झुंबड उडाल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्याचबरोबर विंध्वस झाल्यानंतर विदारक दृश्य समोर आले होते. मात्र आता प्रत्यक्ष बॉम्बस्फोटाचे फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज असलेला हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे.
The closest CCTV footage of the Delhi blast pic.twitter.com/008QmGoYrQ — Gabbar (@GabbbarSingh) November 12, 2025
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आय-20 गाडी ही गर्दीच्या ठिकाणी असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आजूबाजूला अनेक रिक्षा असल्याचे देखील व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. स्फोट झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या गाड्यांचा आणि लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. हा एक आत्मघातकी हल्ला असून डॉ. डॉ. उमर उन नबी हाच गाडी चालवत असल्याचे देखील समोर आले आहे. सदर गाडीमध्ये एक पाय सापडला होता. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. या पायाचा डीएनए रिपोर्ट समोर आला आहे. या डीएनए चाचणी केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. उमर नबी या दोघांनी लाल किल्ला परिसराची रेकी होती. या सगळ्यांनी मिळून प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच स्फोटासाठी जी गाडी वापरण्यात आली होती, त्यामध्ये डॉ. मोहम्मद उमर हा होता. त्याने आत्मघाती हल्ला केला. डीएनए चाचणीत गाडीतील मृतदेह मोहम्मद उमर याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.






