नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकल्यानंतर, माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर विमल पान मसालाबद्दल एक ट्विट केले आहे आणि एक मीम शेअर केला आहे. वास्तविक, राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने एकही नाणेफेक गमावलेली नाही.
नाणेफेकीनंतर वसीम जाफरने विमल पान मसाल्याच्या पॅकेटच्या दोन्ही बाजूंचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने आठपैकी आठ नाणेफेक जिंकल्या आहेत, भाऊ हेड/’टेल किंवा मग हिंदी/’ इंग्रजी?’