Rahul Gandhi Video

    जयपूर : आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनल मॅच भारत हरल्यानंतर आता हा राजकीय चर्चेचा विषय ठरू लागला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी राजस्थानच्या जालोर येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. यावेळी राहुल यांनी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर भाष्य केले. ते म्हणाले की, आपल्या टीमने विश्वचषक जिंकला असता परंतु पनौतीमुळे आपण हरलो.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधींनी पराभवाला मोदींना जबाबदार धरले आहे. याचदरम्यान सभास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पनौती, पनौती असे म्हणत ओरडायला सुरुवात केली. पुढे राहुल गांधी म्हणाले की, आपल्या पोरांनी चांगली मॅच जिंकली असती. परंतु पनौतीने आपल्याला पराभूत केले. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत. जनतेला मात्र हे सगळे माहिती आहे. असे म्हणत राहुल गांधींनी पुन्हा मोदींवर निशाणा साधला.

    भारताच्या पराभवाचे खापर पंतप्रधान मोदींवर

    दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षांनीही विश्वचषकातील भारताच्या पराभवाचे खापर पंतप्रधान मोदींवर फोडले. अजय राय म्हणाले की, मोदींना पाहून भारताचे प्लेअर तणावात होते. मोदींमुळेच आपला पराभव झाला. कारण खेळाडूंवर दबाव होता. तेच पराभवाचे कारण ठरले आहेत.