फोटो सौजन्य: iStock
उन्हाचा पारा हा वाढताना दिसत आहे. देशातील अनेक ठिकाणी नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहे. यातही देशातील राजधानी दिल्लीला उन्हाचे जास्त चटके बसत आहे. दिल्ली आणि लगतच्या एनसीआरमधील उष्णतेमुळे लोकांना पुन्हा एकदा घाम फुटू लागला आहे. काही दिवसांपूर्वी लोकांना कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला होता, पण पुन्हा एकदा उष्णतेचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीसह, उद्या म्हणजे 15 एप्रिल 2025 एनसीआर परिसरातही उष्णता वाढेल. उद्या दिवसभर चांगलेच उन्ह राहील आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची अपेक्षा आहे.
दिल्लीत दिवसा 10 ते 15 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. तसेच, रात्रीचे किमान तापमान 26 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. रात्रीही जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यानंतर, उष्णता वाढतच राहील आणि 2 दिवसांनी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. सध्या तरी, येत्या काही दिवसांत उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी काळजी घेतली पाहिजे.
India Weather Forecast: देशासह राज्यावर पावसाबरोबरच येतेय ‘हे’ संकट; IMD चा अलर्ट काय?
पुढील २४ तासांत बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये तसेच तामिळनाडू, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांवर हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, दक्षिण छत्तीसगड, कर्नाटक आणि ईशान्य भारतातही हलक्या सरी पडू शकतात. दरम्यान, येत्या ३ ते ४ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या पश्चिम राजस्थानमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 16 ते 18 एप्रिल दरम्यान राजस्थानच्या अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते. तसेच, उद्या तेलंगणा, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. तसेच 16 ते 18 एप्रिल दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्येही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
जर आपण उत्तर प्रदेशबद्दल बोललो तर राजधानी लखनऊमध्ये हवामान स्वच्छ राहू शकते. येथे 10 ते 15 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. दिवसाचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर रात्रीचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उद्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथे उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे.