''ऑपरेशन सिंदूर' मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!'; PM मोदींवर टीका करत ममता बॅनर्जींनी दिलं लाईव्ह चर्चेचं खुलं आव्हान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव मुद्दाम राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिलं आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन देशहितासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवत आहेत, पण केंद्र सरकार मात्र राजकीय खेळी करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की, त्या ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात नाहीत. मात्र, पंतप्रधान मोदी देशभर प्रचारासाठी या ऑपरेशनचा वापर करत आहेत. “पंतप्रधान जे बोलत आहेत, ते चुकीचं आहे. विरोधक देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी, लोकशाहीचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी परदेशात जात आहेत. देशाला बदनाम करण्यासाठी नव्हे, असं त्यांनी म्हटलं आहे.
ममतांनी पंतप्रधानांना थेट आव्हान दिलं आहे “जर खरोखरच दम असेल, तर उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करा. बंगाल तयार आहे.” मोदींनी बंगलाच्या महिलांचा अपमान केला आहे. आम्ही आदर करतो, पण आत्मसन्मान गहान ठेवून नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ममतांनी पंतप्रधान मोदींना टीव्हीवर थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे. “जर हिंमत असेल तर माझ्याशी लाईव्ह डिबेटमध्ये या. टेलिप्रॉम्प्टर घेऊन यायचं असेल तर तेही चालेल,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच, त्यांनी भाजपकडून ‘ऑपरेशन बंगाल’ची योजना पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला.
मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोरलाल धाकड यांच्या प्रकरणावरूनही ममतांनी निशाणा साधला. “मध्य प्रदेशात जे झालं, त्यावर तुम्हाला लाज वाटत नाही का? जणू रस्त्यावर अश्लील व्हिडिओ दाखवले जात आहेत,” असं म्हणत त्यांनी भाजपच्या महिला विषयक दृष्टीकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजप बंगालची प्रतिमा खराब करत आहे, असा आरोप करत ममतांनी म्हटलं, “पंतप्रधान मोदी अमेरिकेने काही म्हटलं की शांत बसतात. पण इथे मात्र बंगालला बदनाम करत आहेत.” त्यांनी भाजपवर इतिहास पुसण्याचा, गांधीजींचं नाव हटवण्याचा आरोपही केला.
Yamuna Water : लोकसभा निवडणुकीपर्यंत यमुनेचे पाणी पिण्यायोग्य बनवणार: केंद्र सरकारडून नवं मॉडेल तयार
“बंगाल ही टागोर, विवेकानंद, गांधीजींची भूमी आहे. भाजप त्यांचा अपमान करत आहे. बंगाल कधीही भाजपला स्वीकारणार नसल्याचं त्यां म्हणाल्या. ममता बॅनर्जींच्या या आरोपांनी आणि आव्हानांनी आगामी निवडणुकांमध्ये राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.