Photo Credit- Team Navrashtra संसदेत काय नेले जाऊ शकते आणि काय घेऊ शकत नाही याबाबत काय नियम आहेत
Rules of Parliament: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाल्यापासून अधिवेशनाचे वातावरण तापू लागले आहे. अशातच आज (6 डिसेंबर) सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यसभेतील काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या जागेवर चलनी नोटांचे बंडल सापडल्याची बातमी समोर आली आणि राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी या प्रकरणाची माहिती दिली. ‘मी खासदारांना कळवू इच्छितो की, काल (गुरुवारी) सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर नियमित तपासणीदरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीट क्रमांक 222 मधून चलनी नोटांचे एक बंडल जप्त करण्यात आले आहे. ही जागा अभिषेक मनु सिंघवी यांची असल्याचेही धनखड यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकही आक्रमक झाले. पण संसदेत जाण्यासाठी काय नियम असतात. संसदेत जाताना काय घेऊन जाऊ शकता आणि काय नाही, यााबात आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे संसदेचे नियम माहिती असणेही आवश्यक आहे.
पैशांच्या रकमेबाबत कोणतेही स्पष्ट निर्बंध नाहीत, परंतु सभागृहात त्याचे प्रदर्शन किंवा वापर करण्यावर निर्बंध आहेत. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत नोटांचे बंडल घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. 2008 च्या ‘नोट फॉर व्होट’ प्रकरणात काही खासदारांनी लोकसभेत नोटा प्रदर्शित केल्या होत्या. हा नंतर संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान मानला गेला. यानंतर संसदेत मोठी रक्कम आणण्यावर बंदी घालण्यात आली आणि कडक नियम करण्यात आले.
Babri Demolition 32 Years: बाबरी मशिद विध्वंसाचे 32 वर्षे; वाचा, 6 डिसेंबर 1992 काय झालं होतं?
नियमांनुसार, खासदारांना त्यांच्या खासदारकीसाठी आणि कार्यकारी कर्तव्यांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीच सभागृहात घेऊन जाण्याची परवानगी आहे. यामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज, त्यांच्या कामाशी संबंधित दस्तऐवज, नोट्स, अहवाल, विधेयके, वादविवादांमध्ये सहभागी होण्यासाठी तयार केलेली भाषणे किंवा इतर संदर्भ साहित्य यांचा समावेश होतो. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये, विशेष परवानगीने मर्यादित वापरासाठी मोबाइल फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप बाळगण्यास परवागनी देण्यात आली आहे.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी नोटा मिळाल्याचे सांगताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही (अध्यक्षांनी) त्यांचे (अभिषेक मनू सिंघवी) नाव बोलायला नको होते.’ खर्गे यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला. त्यावर खर्गे म्हणाले की, अशी चिखलफेक करून देशाची बदनामी केली जात आहे. तुम्ही (अध्यक्ष) कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आणि जागा याबद्दल कसे म्हणू शकता? खर्गे यांच्या आरोपांवर सभापती म्हणाले की, ती कोणत्या जागेवर सापडली आणि ती कोणाला दिली गेली हे त्यांनी सांगितले आहे.
Pro Kabaddi League 11 : दबंग दिल्लीची शानदार खेळी; अखेरच्या टप्प्यात यूपी योद्धाला
त्यानंतर याप्रकरणी काँग्रेस खासदार मनु सिंघवी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्यसभेत नोटांचे बंडल सापडल्याच्या आरोपावर काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ‘मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे. आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते. मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा 500 रुपयांची नोट सोबत घेऊन जातो. माझ्या सीटवर चलनी नोटांचे बंडल सापडल्याचे मी प्रथमच ऐकले आहे. मी 12:57 वाजता संसदेत पोहोचलो आणि सभागृह 1 वाजता सुरू झाले. यानंतर दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसून संसदेतून बाहेर पडलो.