Photo Credit- Social Media
हरयाणा: हरयाणा विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले. या निकालात निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला. पण काँग्रेसच्या पदरी मात्र निराशाच आली. निवडणुकीपूर्वी आणि मतदानानंतर अनेक तज्ज्ञ, एक्झिट पोल आणि टीव्ही चॅनेल्सवर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा असा दावा करत होते. पण निकाल उलटेच लागले. राजकीय तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनीही काँग्रेसच्या विजयाचा दावा केला होता, पण यावेळी त्यांचाही अंदाज चुकीचा ठरला. यावर योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
योगेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट करत हरियाणा निवडणुकीच्या निकालांवर सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हरयाणाच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. “आजचे निवडणूक निकाल पाहून मला धक्का बसला आहे, विशेषत: हरियाणाचे निकाल. आज संध्याकाळी काँग्रेसची पत्रकार परिषद पाहून मी अस्वस्थ झालो आहे. मला आजूबाजूच्या मित्रांकडून फोन आणि मेसेज येत आहेत की काय झाले ते विचारत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी जागांबाबत कोणतेही भाकित करणार, असे मी सांगितले होते. पण या निवडणुकीत काँग्रेसला बहूमत मिळणार असल्याचे मी अनेकदा सांगितले होते.
हेही वाचा:महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती कधीच शक्य नाही…; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले
योगेंद्र यादव म्हणाले की, “आम्ही स्थानिक पातळीवर खूप फिरलो. आमचे सहकारी मैदानावर होते, सर्वसामान्यांशी बोललो, त्या आधारे काँग्रेसला बहुमत मिळणार हे उघड झाले. सर्व रिपोर्टर, अँकर आणि चॅनलही एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असेच सांगत होते.
पण आज संध्याकाळी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन जे काही गंभीर आरोप केले. हा निकाल आम्ही मान्य करू शकत नाही, असे जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी काही विधानसभेचे पुरावेही दिले. मी स्वतः विधानसभेचा पुरावा पाहिला आहे, ही जागा महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौंदची जागा आहे. अशा अनेक जागा आहेत ज्यासाठी काँग्रेसने लवकरच पुरावे देण्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
हेही वाचा: शारदीय नवरात्रीत कन्या पूजन कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या पूजेची वेळ
मतमोजणीदरम्यान काही ईव्हीएम आढळून आल्या ज्यामध्ये 99 टक्के बॅटरी होती. त्या जागांवर काँग्रेसची कामगिरी खराब होती, तर कमी बॅटरी टक्के असलेल्या जागांवर काँग्रेसची कामगिरी चांगली होती. मात्र, काँग्रेसने याचा पुरावा देणार असल्याचेही म्हटले आहे. मी काँग्रेसच्या या आरोपांना दुजोरा देत नाही, मात्र निवडणूक आयोगाने या सर्वांची चौकशी करावी. निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात आणि आयोगाने याची खात्री करावी. निवडणूक आयोगाला माझी एवढीच विनंती आहे की, निवडणूक आयोगाने जनतेसमोर सत्य काय आहे ते मांडावे.
योगेंद्र यादव म्हणाले की, निकाल काहीही लागले असले तरी मुद्दे संपत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांवर काँग्रेसला लक्ष द्यावे लागणार आहे. काँग्रेस आली तर एका जिल्ह्याची राजवट, एकाच जातीची राजवट, एकाच कुटुंबाची राजवट, अशी लोकांच्या मनात काही शंका आहे का, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीत जी चपळता यायला हवी होती, ती होती का? जी कामं काँग्रेस सोडून इतर पक्षसंघटनांकडून व्हायला हवी होती, ती झाली का ? आगामी काळात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका आहेत. याआधी विरोधकांना या सगळ्यावर काम करावे लागणार आहे.