Photo Credit- Social Media (देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर)
मुंबई: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातही हरयाणाची पुनरावृत्ती होईल, असे संकेत देत विरोधकांवर निशाणा साधला. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. हे कधीच शक्य होणार नाही, असे सांगत फडणवीसांना सुनावलं आहे.आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि हरयाणातील राजकीय परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे.
हरयाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, ‘हे कधीही शक्य नाही. हरयाणातला विजय हा काही दैदीप्यमान विजय नाही. हरयाणातला पराभव हा दुर्दैवी आहे. पण यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. देशातल्या निवडणुका आम्हाला एकत्रच लढाव्या लागणार आहेत. लोकसभेतलं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे. आता महाराष्ट्रात काय असं तुम्हाला वाटत असेल तर, हरयाणाच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे आणि इथे काँग्रेस एकटी नाही, इथे काँग्रेससोबत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेतृत्त्वही आहे.” अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले आहे.
हेही वाचा: इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य; लेबनॉनमध्ये जोरदार क्षेपणास्त्रांचे हल्ले
तसेच, ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केल्यामुळे हरयाणात काँग्रेसची मते विभाजित झाली. आमच्या मतांमध्ये विभाजन झाले. हिंदीत, ‘जो जिता वही सिकंदर’ अशी म्हण आहे. त्यासाठी तुमचं नक्कीच अभिनंदन करतो. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी केल्या आहेत. त्याचाही विचार व्हायला हवा. हरयाणा हे 90 जागांच्या विधानसभेचं राज्य आहे. तिथे जाती-पातीचीही काही गणिते आहेत. तरीही काँग्रेसला 36 जागा मिळाल्या. फक्त 9 जागा कमी पडल्या. पण यातून आम्ही निराश झालेलो नाही. पण यातून काँग्रेलाही धडा घ्यावा लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सूचित केलं.
संजय राऊत म्हणाले, ” भाजपने हरयाणाची निवडणूक अत्यंत प्रभावीपणे लढली हे मी मान्य करतो. काँग्रेस जिंकत होती पण भाजपने हारलेली बाजी जिंकली. जम्मू-कश्मीर हे अत्यंत महत्त्वाचं राज्य होंतं. 370 कलम हटवल्यावर क्रांती होईल. 370 कलम हटवलं हा त्यांच्या प्रचाराचा भाग होता. राममंदीर उभारणे आणि 370 कलम हटवून, आणि त्याचा प्रचार करून सुद्धा जम्मू-कश्मीरमध्ये मोदीं आणि त्यांचा पराभव झाला. हरयाणा आणि जम्मू-कश्मीरम या दोन्ही राज्यांत 90 जागांचीच विधानसभा आहे. त्यामुळे आम्ही 50-50 जे म्हणतो, ते हरयाणा तुमच्याकडे आणि जम्मू-कश्मीर आमच्याकडे आली.
हेही वाचा: इसरोमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज
हरयाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. हरयाणात इंडिया आघाडी झाली असती, समाजवादी पार्टी, आप, शिवसेना, एनसीपीला जागा मिळाली असती, तर याचा सगळ्याचा परिणाम आपल्या आघाडीला झाला असता. पण काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू असं वाटलं. पण जिथे काँग्रेस कमजोर असते तिथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते. पण काही ठिकाणी ती स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाही. या सगळ्याचा परिणाम हरयाणाच्या निकालावर झाला. नाहीतर हरयाणात भाजपचा विजय होईल, असे सांगणारा मला एकही व्यक्ती किंवा पत्रकारही भेटला नाही.असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.