कधी कधी मित्र मस्करीमध्ये काय करतील याचा नेम नाही. पण ही कधी कधी ही मस्करी जीवघेणीही ठरू शकते. याचीच प्रचिती आली आहे, उत्तरप्रदेश मधील एका घटनेवरुन. उत्तरप्रदेशमध्ये एका तरुणाने असे काम केले की,पोलीसही चक्रावले. या तरुणाने मस्करीमध्ये त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या मित्राच्या प्रायव्हेट पार्टमधून शरीरात हवा भरली. (youth died due to air filling his body from the private part) यामुळे त्याचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांना तो धक्का सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीसह दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
[read_also content=”ढाबा स्टाईलनं बनवा वांग्याचं भरीत, अस्सल गावरान चव येईल! https://www.navarashtra.com/latest-news/vangyacha-bharit-on-dhabha-style-nrps-435667.html”]
हरिद्वारच्या सिडकुलमध्ये एका कर्मचाऱ्याने कंपनीत ठेवलेल्या हवेच्या दाबाच्या यंत्रानं एका तरुणाने त्याच्या कर्मचारी मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरली. अंगात हवा भरल्याने त्याची तब्बेत बिघडली. दोन दिवसांनी रुग्णालयात उपचारा त्याचा दरम्यान मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन झाल्याने आठवडाभरानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला.
मृत कर्मचाऱ्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन तरुणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या एप्रिल महिन्याची आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.