आजकाल ऑनलाइन फूड ऑर्डर करणे खूप सामान्य आहे. आपण दररोज किंवा दर आठवड्याला ऑनलाइन फूड अॅप्सद्वारे आमचे आवडते पदार्थ ऑर्डर (Zomato delivery boy eat customer food ) करतो. आज तो आपल्या जीवनशैलीचा एक नियमित भाग बनला आहे. मात्र, अनेकवेळा हे पदार्थ घेऊन येणारे डिलिव्हरी बॅाय ग्राहकांपर्यंत पदार्थ नेऊन देताना खातानाही दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय ट्रॅफिक सिग्नलवर ग्राहकाचे जेवण खाताना दिसत आहे.
[read_also content=”बँकांना आता 2 दिवस सुट्टी..अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला, लवकरच मिळणार मंजुरी! https://www.navarashtra.com/india/bank-may-have-soon-5-days-working-and-all-saturady-off-nrps-441812.html”]
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. हा व्हिडिओ बेंगळुरूचा आहे. यामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात एक माणूस ट्रॅफिकमध्ये बाईक घेऊन ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहे. तो डब्यात हात घालतो आणि काहीतरी बाहेर काढतो आणि खायला लागतो.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी त्याच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्न ग्राहकांपर्यंत कसे पोहोचेल? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
एका फेसबुक वापरकर्त्याने लिहिले, “विक्रेत्याने अन्न पूर्णपणे सील केले पाहिजे आणि कोणीही ते उघडू शकणार नाही अशाप्रकारे पॅक करावे. तर दुसर्या व्यक्तीने लिहिले, “हे असं अनेकदा घडतं. यापूर्वीही याबद्दल तक्रार करण्यता आलेली आहे. परंतु Zomato कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.