एक चूक LSG ला पडली महागात; ऋषभ पंतांच्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्स ठरली विजयी....(फोटो सौजन्य- pinterst and x )
विशाखापट्टणम् : दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज आशुतोष शर्माने केलेल्या नाबाद ६६ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने लखनौवर १ विकेटने विजय मिळवला. जेव्हा त्यांची टीम अडचणीत होते तेव्हा टीमने एलएसजीला आवाहन केले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ६ धावांचा लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र एलएसजी जवळ शेवटच्या ओव्हरमध्ये विजयाची संधी होती. ज्याने स्वतः एलएसजी कॅप्टन ऋषभ पंतने गमावले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात महत्त्वाच्या क्षणी झालेल्या चुकीला पंतने फारसे महत्त्व दिले नाही.
झालं असं, की शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीच्या विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. पंतने आश्चर्या करणारा निर्णय घेत शहाबाज अहमदला चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूत मोहित शर्मा शॉट खेळण्यासाठी क्रीजबाहेर आला. मात्र चेंडूला बरोबर कनेक्ट करू शकले नाही आणि त्यांच्या पॅडवर लागला. पंत जवळ स्टंपिंगची संधी होती. मात्र तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. फलंदाज आणि कीपर ऋषभला चकमा देत चेंडू विकेटच्या मागे गेला.
पंतने स्टंपिंगची संधी हुकवली पण त्याने लगेच डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये चेंडू स्टंपवरून जात असल्याचे दिसून आले, ज्यामुळे दिल्लीला दिलासा मिळाला. त्यानंतर मोहितने एक धाव घेतली आणि आशुतोष स्ट्राईकवर आला आणि पुढच्याच चेंडूवर शाहबाज अहमदच्या डोक्यावरून एक मोठा षटकार मारून दिल्लीला एक विकेटने विजय मिळवून दिला. जर ऋषभने तो स्टंपिंग चुकवली नसती, तर हा विजय निश्चितच लखनौला मिळाला असता.
दिल्लीच्या विजयानंतर, संघ आणि चाहते आनंदी असताना, लखनौच्या चाहत्यांनी स्टंपिंगच्या त्या क्षणाची चर्चा सुरू केली. पण पंतने त्याला खेळाचा एक भाग मानून त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सामन्यानंतरच्या प्रेझंटेशनवेळी तो म्हणाला, “अर्थातच, या सामन्यात नशीबाचीही भूमिका महत्त्वाची असते. जर त्याच्या (मोहित शर्मा) पॅड लागला नसता तर स्टंपिंगची संधी मिळू शकली असती. पण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत राहतात. याकडे लक्ष देण्याऐवजी आपण चांगले खेळले पाहिजे.” पण चाहत्यांनी यासाठी थेट ऋषभ पंतला जबाबदार धरले. त्याच्या खराब कीपिंगमुळे लखनौ सामना गमावला.
Misses the stump , going for LBW . Shame on you Me Pant #LSGvsDC #IPL2025 #RishabhPant #starc #NupurSharma #kunalkamra #HarbhajanSingh #NicholasPooran pic.twitter.com/vXNX1OQIpG
— fart cat 🐱 smokimg🚬 (@gajendra87pal) March 24, 2025
विशाखापट्टणम येथील व्हीएसआर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक दिल्लीच्या बाजूने गेली आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मिचेल मार्श (७२) आणि निकोलस पूरन (७५) यांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. मार्शने दिल्लीच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली, तर पूरन फिरकीपटूंसाठी एक दुःस्वप्न ठरला. या दोघांच्या शानदार खेळीमुळे लखनौला २०९/८ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
दिल्लीच्या डावात, लक्ष्याचा पाठलाग करताना सामना अनेक वेळा कधी लखनौ तर कधी दिल्लीच्या बाजूने गेला. लखनौने अचूक लाईन अँड लेंथसह गोलंदाजी केली आणि दिल्लीच्या टॉप-ऑर्डरला उद्ध्वस्त केले. सातव्या षटकात, दिल्ली ६५/५ वर संघर्ष करत होती आणि त्यांचा विजय जवळजवळ अशक्य दिसत होता. पण संघाला एका चमत्कारिक कामगिरीची आवश्यकता होती आणि आशुतोषने ते केले.
आशुतोषने दोन महत्त्वाच्या भागीदारी करून दिल्लीच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आशुतोष आणि विप्राज निगम (३९) यांच्यात ५५ धावांची भागीदारी, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष यांच्यात ४५ धावांची भागीदारी. त्याआधी, अक्षर पटेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्यातील ४३ धावांच्या भागीदारीने विजयाचा पाया रचला.
या भागीदारींचे महत्त्व मान्य करताना पंत म्हणाला, “दिल्लीने काही चांगल्या भागीदारी केल्या. आशुतोषने स्टब्ससोबत एक आणि विप्राज निगमसोबत एक. मला वाटते की निगमने शानदार खेळ केला आणि त्याने सामना आमच्याकडून हिरावून घेतला. गोलंदाजांसाठीही बरेच काही होते, परंतु आम्हाला मूलभूत गोष्टींमध्ये आणखी सुधारणा कराव्या लागतील. आम्हाला दबाव जाणवला, परंतु आम्ही अजूनही संघ स्थिर करण्याच्या प्रक्रियेत आहोत. या सामन्यातून आम्हाला खूप सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत.” आशुतोष शर्माच्या शेवटच्या विजयी षटकाराच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सने १९.३ षटकांत ९ गडी गमावून २११ धावा करून सामना जिंकला.