pravin darekar

प्रवीण दरेकर हे जालना जिल्यातील बदनापूरमध्ये अजिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास गेले होते. यावेळी त्यांनी हाथरस येथील प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, उत्तरप्रदेशातील घटना दुर्दैवीच आहे.

  • संजय राऊतांच्या वक्तव्याचा प्रवीण दरेकरांनी घेतला खरपूस समाचार

जालना : उत्तरप्रदेशमधील हाथरस (hathras gang rape) येथील बलात्काराच्या मुद्द्यावर महाराष्ट्रत विरोधक राजकारण करत आहेत. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. असे विधान परिषदेतील पक्षनेते प्रवीण दरेकर  (Praveen Darekar) यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेशातील घटनेचे माहाराष्ट्रत राजकारण होत (Maharashtra politics on Hathras case) असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

प्रवीण दरेकर हे जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये अजिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास गेले होते. यावेळी त्यांनी हाथरस येथील प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, उत्तरप्रदेशातील घटना दुर्दैवीच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच उत्तर प्रदेशातील योगी अदित्यनाथ सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेलं नाही. भाजपच सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे या घटनेची कोणीही पाठराखण करणार नाही असे त्यांनी सांगितले.

राऊतांवर खोचक टीका

हाथरस प्रकरणात महाराष्ट्रात राजकारण होत आहे. याबाबत प्रवीण दरेकरांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, रोहामध्ये १४ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आणि त्या मुलीला दरीत फेकण्यात आले. पुण्यात तरुणीला डोंगरात नेऊन मारले. या घटना घडल्या तेव्हा राज्य सरकार का गप्प होते. तसेच कोरोना काळात कोविड वार्डात महिलांवर बलात्कार झाले त्यावेळी को कोणीही पुढे आले नाही. परंतु आता उत्तर प्रदेशातील घटनेवर सर्व राजकारण करताना दिसत आहे. अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सरकार पाच वर्षे पूर्ण करो किंवा न करो त्याच्याशी आमचे काही देणं घेण नाही. परंतु महाराष्ट्रातील जनता आज वेगवेगळ्या संकटांनी ग्रासली आहे. प्रचंड आर्थिक नुकसान जनतेचे झाले आहे. परंतु राज्य सरकार त्यांना न्याय देण्यात कमी पडत आहे. म्हणून आम्ही सर्व नुकसानग्रस्तांना भेटून त्यांना दिलासा देत आहोत.

सरकार काम करत नाही म्हणून आपल्याला मराठवाड्यात यावं लागलं .सरकार घरात बसलं आहे. आम्ही विरोधी पक्ष फिरतोय. कोविडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वत: फिरत होते. आरोग्य सेवेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून देत होते. पण सरकार घरात बसलं आहे, त्यांना या सर्व गोष्टींचं काहीही पडलं नाही, अशी खोचक टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.