साडीची निवड करताना हल्ली सर्वच महिला हातमागावर विणलेल्या सिल्क साड्यांची खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देतात. हातमागावर विणलेल्या सिल्क साड्या नेसल्यानंतर अंगावर अतिशय चापून चोपुन बसतात आणि लूक अतिशय सुंदर दिसतो. लग्नसोहळा किंवा घरातील इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने सिल्क साड्यांची खरेदी केली जाते. पण बऱ्याचदा साडी खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. कांजीवरम साडी, बनारसी साडी, माहेश्वरी साडी, चंदेरी साडी, कोटा डोरिया साडी, नऊवारी साडी, पटोला साडी, बालुचारी साडी, तांत साडी आणि भागलपूर सिल्क साडी इत्यादी हातमाग साड्यांची खरेदी करताना या गोष्टींची घ्या आवर्जून काळजी. (फोटो सौजन्य – pinterest)
हातमागावरील रेशमी सिल्क साड्यांची खरेदी करताना 'या' चुका करणे टाळा, अन्यथा होईल मोठी फसवणूक

हातमागावर विणलेली साडी खरेदी करायला गेल्यानंतर सगळ्यात आधी साडीवर अधिकृत सिल्क टॅग किंवा लोगो आहे की हे पाहावे. अस्सल रेशीम ओळखण्यासाठी साडीवर लोगो ओळखणं आवश्यक आहे.

अस्सल रेशमी साड्या प्लास्टिकप्रमाणे गुळगुळीत नसून त्यांना स्पर्श केल्यानंतर त्या निसरड्या वाटतात. रेशमी साड्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या समृद्ध परंपरेचा वारसा आहेत.

थंडीच्या दिवसांमध्ये हातमाग साडी खरेदी करायची असल्यास बनारसी किंवा कांजीवरम साडीची निवड करावी. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मलबेरी किंवा चंदेरी साडी उत्तम पर्याय आहे.

अस्सल हातमाग साडीवर मंदिराच्या नक्षीचे काठ, चौकोनी नक्षी, नाणी, मोर तयार केलेले असतात. तर मशीनमेड साड्यांवर मोर आणि इतर डिजिटल प्रिंट असतात.

हातमाग साडीवरील जरीला स्पर्श केल्यानंतर गुळगुळीत आणि चमकदार दिसते. हेच मशीनमध्ये तयार केलेल्या साडीला स्पर्श केल्यानंतर साडी खडबडीत किंवा टोचणारी वाटते.






