(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
देशातील ‘इक्विटी संस्कृती’ आता केवळ दक्षिण मुंबईतील अल्टामॉन्ट रोड आणि मलबार हिल किंवा वांद्रे यांसारख्या श्रीमंत भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. WFE नुसार ट्रेड संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची मोठी इक्विटी एक्स्चेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमुळे हे शक्य झालंय. गेल्या ३० वर्षांत ग्रेटर नोएडा आणि रांची मधील कुटुंबे देखील त्यांचा अतिरिक्त निधी सूचीबद्ध इक्विटी आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवत आहेत.
हा मुद्दा आणखी स्पष्ट करण्यासाठी आपण उपलब्ध आकडेवारीचा विचार करायला हवा. आर्थिक वर्ष26 च्या अखेरीस एकूण युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांपैकी अनुक्रमे १५.६%, ११.७% आणि ८.५% हिश्श्यासह महाराष्ट्र, युपी आणि गुजरातचे गुंतवणूकदार NSE वर वर्चस्व गाजवत आहेत यात शंका नाही. परंतु हा ट्रेंड आता बदलतोय. अशा राज्यांमध्येही गुंतवणूकदारांची मोठी वाढ पाहायला मिळत आहे, ज्यांचा पूर्वी भांडवली बाजाराशी खूपच मर्यादित सहभाग होता. उदाहरणार्थ, बिहारचा एकूण युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांमधील हिस्सा २०१५-१६ च्या अखेरीस १.६% होता, तो २०२५-२६ च्या अखेरीस वाढून ४.७% झाला आहे. त्याचप्रमाणे, आसामचा हिस्सा २०१५-१६ च्या अखेरीस ०.६% होता, तो २०२५-२६ च्या अखेरीस २.२% वर पोहोचला आहे.
देशातील गुंतवणूकदारांचा सहभाग आणि संपत्ती निर्मितीच्या लोकशाहीकरणात NSE ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यात आश्चर्य नाही – मे २०२६ मध्ये NSE च्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा आकडा १२.९ कोटींवर पोहोचला आणि पुढील महिन्यात आणखी १२.३ लाख गुंतवणूकदारांची भर पडत या आकड्याने १३ कोटींचा टप्पा ओलांडला. नोंदणीकृत गुंतवणूकदारांची पहिला कोटीचा टप्पा गाठण्यासाठी १४ वर्षे लागली होती. आज, जागतिक स्तरावरील या सर्वात मोठ्या मल्टि-अॅसेट क्लास एक्स्चेंजवर (multi-asset class exchange) गुंतवणूकदारांच्या संख्येत दर सहा महिन्यांनी एक कोटींची भर पडतेय.
२०२५-२६ मध्ये एकूण युनिक क्लायंट कोड्सचा आकडा २५ कोटींच्या पार गेला, जे देशातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या बेसचा वेगाने होणारा विस्तार आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती हे दोन्ही मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करते. तसेच, आर्थिक वर्ष १५-१६ ते आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान नोंदवलेल्या १५.२% चक्रवाढ वाढीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष २१-२२ ते २०२५-२६ दरम्यान NSE वरील एकूण गुंतवणूकदार बेस २६.४% च्या चक्रवाढ दराने वाढला आहे. गुंतवणूकदार बेसचा हा विस्तार भौगोलिकदृष्ट्या देखील व्यापक असून, तो आता देशातील ९९.८५% पिन कोड्सपर्यंत राष्ट्रीय शेअर बाजार पोहोचला आहे.
याशिवाय, गेल्या आर्थिक वरच्या अखेरीस २ कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. तथापि, उत्तर भारत एकूण ४ कोटी ७२ लाख ९० हजार युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांसह आघाडीवर आहे. त्याखालोखाल पश्चिम भारतात ३कोटी ७८ लाख १० हजार युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदार, दक्षिण भारतात २ कोटी ७१ लाथ ४० हजार युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदार आणि पूर्व भारतात १ कोटी ५६ लाख ३० हजार युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत.
गेल्या काही वर्षांत, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि स्केल यांच्या बळावर आधुनिक गुंतवणूक इकोसिस्टम तयार करण्यात आणि वित्तीय बाजारांमधील प्रवेश सुलभ करण्यात NSE ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अखंड ट्रेडिंग इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यापासून ते मार्केट-लिंक्ड गुंतवणूक उत्पादनांना पाठबळ देण्यापर्यंत, एक्स्चेंजने देशभरातील किरकोळ (retail) गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करणे अधिक सोपे, जलद आणि अधिक सुलभ केले आहे.
गुंतवणूकदारांच्या या विस्ताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘तरुण भारता’चा वाढता सहभाग. NSE वरील नोंदणीकृत गुंतवणूकदारांचे सरासरी वय आर्थिक वर्ष २०-२१ मधील ३६ वर्षांवरून घसरून ३३ वर्षांपेक्षा कमी झाले आहे, तर जवळपास ४०% गुंतवणूकदार ३० वर्षांखालील आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा उदय, मोबाईल-आधारित गुंतवणूक आणि सुलभ ऑनबोर्डिंग प्रक्रियांनी नवीन पिढीच्या गुंतवणूकदारांना अधिक आत्मविश्वास आणि जागरूकतेसह भारताच्या विकास गाथेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. तसेच, भारताचे तरुण वाढत्या प्रमाणात NSE कडे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे आणि त्यांनी स्वतःसाठी ठरवलेली विविध वित्तीय उद्दिष्टे पूर्ण करण्याचे एक साधन म्हणून पाहत आहेत.
NSE वर गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदार बेसचा झालेला जलद विस्तार आणि बचतीचे वित्तीयीकरण यामागील एक प्रमुख घटक म्हणजे, गुंतवणूकदारांची जागरूकता आणि वित्तीय साक्षरतेवर या एक्स्चेंजने दिलेला सातत्यपूर्ण भर हा आहे. हे उद्दिष्ट टायर-II, III आणि IV शहरांमधील शैक्षणिक उपक्रम, डिजिटल आउटरीच प्रोग्राम्स आणि गुंतवणूकदार सहभाग उपक्रमांच्या माध्यमातून साध्य केले गेले आहे; अधिक माहितीपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम गुंतवणूकदार समुदाय तयार करण्यासाठी NSE ने सातत्याने काम केले आहे. या उपक्रमांमुळे देशातील वित्तीय आणि शेअर बाजारांवरील विश्वास मजबूत झाला आहे आणि पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित केले आहे.
आज NSE चे योगदान केवळ शेअर्सच्या ट्रेडिंगपुरते मर्यादित राहिलेले नाही. हे एक्स्चेंज भारताच्या वित्तीय रचनेचा (financial architecture) एक महत्त्वपूर्ण स्तंभ बनले असून, इक्विटी, म्युच्युअल फंड, ETFs, IPOs, REITs आणि InvITs या सर्वच क्षेत्रांतील व्यवहारांना ते पाठबळ देत आहे. गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात सहभागी होत असो किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) च्या माध्यमातून गुंतवणूक करत असो, NSE चे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर भारताच्या भांडवली बाजारात अखंड सहभाग साध्य करत आहे.






