उपराजधानी नागपूर सध्या प्रचंड उष्णता आणि उकाड्याच्या तडाख्यात सापडली आहे. त्यातच रात्रीच्या वेळी होत असलेल्या सततच्या लोडशेडिंगमुळे नागरिकांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. पश्चिम नागपुरात वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने आता महावितरणविरोधात आंदोलन छेडले आहे. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जुने काटोल नाका चौक येथील महावितरण कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.






