(फोटो- istockphoto)
श्रीनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहे. तीन टप्प्यात जम्मू आणि काश्मीर विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानुसार, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निडवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.६५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे.
अनंतनाग- ४७.६७ टक्के
डोडा- ६१.९० टक्के
किश्तवाड़- ७०. ०३ टक्के
कुलगाम- ५०. ५७ टक्के
पुलवामा- ३६. ९० टक्के
रामबन- ६०.०४ टक्के
शोपीया – ४६.८४ टक्के
लोकशाहीच्या या उत्सवात जम्मू-काश्मीरमधील जनता उत्साहाने सहभागी होताना पाहायला मिळत आहे. तरुण, महिला, वृद्ध सर्वजण मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. मतदान केंद्रांवरील लोकांच्या रांगा हे नवीन सरकार निवडण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसून येते. निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
https://publish.twitter.com/?url=https://twitter.com/ANI/status/1836348594124918994#
कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ जागांवर मतदान होत आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आणि गेल्या १० वर्षांतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. ५ ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७०रद्द केले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले.
जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीवर दहशतवादी अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण राज्यभरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. चोख सुरक्षेत २४ जागांवर मतदान सुरू आहे. २३ लाखांपेक्षा अधिक मतदार हे आज अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.