मुंबई: राज्यात मंगळवारी १४,१२३ नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patients)नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,६१,०१५ झाली आहे. आज ३५,९४९ रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,३१,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,३०,६८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
[read_also content=”वाराणसीमध्ये दोन मजली इमारत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन केली चौकशी https://www.navarashtra.com/latest-news/building-collapsed-in-varanasi-prime-minister-narendra-modi-called-dm-nrsr-136599.html”]
दरम्यान राज्यात ४७७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ४७७ मृत्यूंपैकी ३४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.
यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३७७ ने वाढली आहे. हे ३७७ मृत्यू, नागपूर- ४३, पुणे- ३८, रायगड- ३७, औरंगाबाद- ३५, अहमदनगर- २९, नाशिक- २८, लातूर- २३, नांदेड- १८, पालघर- १५, सातारा- १५, गडचिरोली- १३, उस्मानाबाद- १०, रत्नागिरी- ९, भंडारा- ८, ठाणे- ७, बीड- ६, हिंगोली- ६, कोल्हापूर- ५, अकोला- ४, धुळे- ४, जळगाव- ४, सोलापूर- ४, गोंदिया- ३, जालना- ३, नंदूरबार- ३, परभणी- २, वर्धा-२, बुलढाणा- १, चंद्रपूर-१ आणि सांगली- १ असे आहेत.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,६१,०१५ (१६.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात ८३० नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात ८३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०६११८ एवढी झाली आहे. तर २३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४८४९ मृत्यूची नोंद करण्यात आली.