File Photo : Drowned
मुंबई : काल देशभरात धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर धुळवडीचं सेलेब्रेशन करण्यात आलं. पण ही धुळवळ साजरी करण्याच्या उत्साहात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील माहिमच्या समुद्रकिनारी धुळवज साजरी करण्यासाठी गेलेले पाच तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत 2 दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर तीनजण सुखरुप बचावले आहेत.
[read_also content=”बिबवेवाडीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; भाचीविषयी वाईट बोलल्याने केले कृत्य https://www.navarashtra.com/maharashtra/a-youth-was-killed-by-a-stone-on-his-head-in-bibwewadi-murdered-for-speaking-ill-of-niece-nrdm-517793.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील माहिमच्या सुमद्रकिनारी काल 5 तरुण धुळवड खेळण्यासाठी गेले होते. खेळता खेळता ते समुद्रात गेले. यावेळी समुद्राला भरती होती. मात्र, खेळण्याच्या नादात तरुण लांब गेले. पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्राच्या पाण्यात पाचही मुलं बुडाली. यावेळी तरुणांना बुडताना पाहून लाईफ गार्डला पाचारण करण्यात आले. लाईफ गार्डने चार जणांना वाचवलं. तर एकजण बेपत्ता होता. वाचवण्यात आलेल्या चौघांना हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. चौघांपैकी दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं. इतर दोघांवर उपचार सुरू होते. मात्र, त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बेपत्ता मुलाचा आज मृतदेह सापडला. ही पाचही मुलं माहीममध्येच राहणारी असून सर्व 20 ते 21 वर्षांचे आहेत. पाचही जण कॉलेजमध्ये शिकत आहेत.