Abhishek Sharma Say Special Thanks to Shubman Gill : अभिषेक शर्माने उधार घेतलेल्या बॅटने शतक ठोकले, अन् बॅटचा मालक स्वस्तात आऊट झाला. अवघ्या 2 धावा करून शुभमन तंबूत परतला. अभिषेक शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यात धमाकेदार खेळी करीत विस्फोटक शतक ठोकले. कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माने पुढच्याच सामन्यात दमदार शतक झळकावून इतिहास रचला. सामनावीर म्हणून निवड झालेल्या अभिषेकने पत्रकार परिषदेत सांगितले की, या शतकी खेळीत त्याने कर्णधार शुभमन गिलच्या बॅटचा वापर केला होता. त्याच्या बॅटचा वापर करीत मी नेहमीच मोठी कामगिरी केल्याचेदेखील त्यांने सांगितले.
अभिषेकने सांगितली शुभमनच्या बॅटची कमाल
Two extremely special phone 📱 calls, one memorable bat-story 👌 & a first 💯 in international cricket!
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
A Hundred Special, ft. Abhishek Sharma 👏 👏 – By @ameyatilak
WATCH 🎥 🔽 #TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/0tfBXgfru9
— BCCI (@BCCI) July 8, 2024
खूप गयावया करून मागितली बॅट, तो देतपण नव्हता
भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक 7 जुलै रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात झळकावले. अभिषेकने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याने ही बॅट खूप गयावया करून शुभमनकडून घेतली होती. मला ज्या ज्या वेळी सामन्यात कमबॅक करायचे असते तेव्हा मी शुभमनच्या बॅटने कमाल केली आहे, असे सांगितले. अभिषेक शर्माला पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुस-या सामन्यात 47 चेंडूत 100 धावांची खेळी करून सामनावीर म्हणून निवडले गेले, तर त्याने कर्णधार शुभमन गिलच्या बॅटने हा पराक्रम केला असल्याचे सांगितले. अभिषेक पुढे जाऊन म्हणाला की, शुभमन गिलचे खरोखर मनापासून आभार आहे, ज्यामुळे मी अशी मोठी कामगिरी करू शकलो.
आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक
अभिषेक शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. 6 जुलै रोजी झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले खातेही उघडू न शकलेल्या अभिषेकने रविवारी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्फोटक शतक झळकावले. या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजाच्या शतकी खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेवर 100 धावांनी विक्रमी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
For his maiden 💯 in his second T20I, Abhishek Sharma receives the Player of the Match 🏆#TeamIndia win by 100 runs and level the series 1️⃣ – 1️⃣
Scorecard ▶️ https://t.co/yO8XjNqmgW#TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/b72Y9LaAiq
— BCCI (@BCCI) July 7, 2024
अभिषेकचे शतक, बॅटचा मालक गिल केवळ दोन धावांवर स्थिरावला
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अभिषेकने या शतकासाठी कर्णधार गिलच्या बॅटचा वापर केल्याचा खुलासा केला आणि त्याने असे करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचेही उघड केले. अभिषेक म्हणाला, आज मी शुभमनच्या बॅटने खेळलो, मी यापूर्वीही हे केले होते. जेव्हा जेव्हा मला धावांची गरज असते तेव्हा मी त्याची बॅट मागतो. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोघे चांगले मित्र आहेत हे इथे नमूद करणं गरजेचं आहे. दोघेही 2018 च्या अंडर-19 विश्वचषक संघात एकत्र होते, ज्याचे नेतृत्व पृथ्वी शॉ करत होते. दोघेही पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकत्र खेळतात. विशेष म्हणजे अभिषेकला आपली बॅट सोपवणाऱ्या गिलला या सामन्यात चार चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या.
फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांकडूनही धमाका
अभिषेकचे शतक, रुतुराज गायकवाडच्या 46 चेंडूत नाबाद 77 धावा आणि रिंकू सिंगची 22 चेंडूत 48 धावांची स्फोटक खेळी यांच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेच्या गोलंदाजीसमोर एकूण 234 धावा केल्या. उत्कृष्ट फलंदाजीनंतर रवी बिश्नोई, आवेश खान आणि मुकेश कुमार या गोलंदाजांच्या जोरावर भारताने पुनरागमन सुरू ठेवले. अवेशच्या 3/15, बिश्नोईच्या 2/11 आणि मुकेशच्या 3/37 स्पेलच्या जोरावर, भारताने सिकंदर रझाच्या झिम्बाब्वेला केवळ 134 धावांवर बाद करण्यात यश मिळविले. आता 100 धावांनी विजय मिळवून भारत 10 जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने प्रवेश करेल.