मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडत आहे. या शाही विवाहसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळी हजेरी लावत आहेत. १२ जुलैपासून सुरू झालेल्या या फंक्शन्समध्ये क्रिकेटर्सही दिसले. भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी आणि नुकताच विश्वचषक जिंकणारा हार्दिक पंड्याही दिसला. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आपल्या पत्नीसोबत फोटोशूट करताना दिसला.
पुन्हा एकदा हार्दिक दिसला पत्नीशिवाय
भारताचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनी सहकुटुंब
जसप्रीत बुमराह पत्नी संजना गणेशनसोबत
भारतीय संघाचा माजी उपकर्णधार केएल राहुल आपल्या पत्नीसोबत
युजवेंद्र चहल सहकुटुंब
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नात हार्दिक पांड्या मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि वहिनी पंखुरी शर्मासोबत दिसला होता.भारतीय क्रिकेटर इशान किशनही पांड्या कुटुंबासोबत दिसला. जो सध्या टीम इंडियापासून दूर आहे. तसेच, पुन्हा एकदा हार्दिकसोबत त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक त्याच्यासोबत पुन्हा दिसली नाही. सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. परंतु, हार्दिकचे पुन्हा एकदा पत्नीशिवाय दिसणे चाहत्यांच्या नजरेत भरत आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विश्वचषक विजेता एमएस धोनीही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहात पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत दिसला होता.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला धोनीचे संपूर्ण कुटुंब पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा परिधान करून आले होते. माहीने गोल्डन शेडचा धोती कुर्ता परिधान केला होता. तर मुलगी जीवा आणि पत्नी साक्षी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. साक्षीच्या ड्रेसचा रंग लिंबू शेडचा होता.