ज्या चीनमधून(China) कोरोनाचा विषाणू(Corona Virus) जगात सर्वदूर पोहोचला, तिथे आता सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला कृत्रिम सूर्य(Artificial Sun of China) आता आणखी आग ओकू लागला आहे. विशेष म्हणजे हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली आहे.
[read_also content=”फक्त काकडीच नव्हे तर तिच्या बियांचेही आहेत अनेक चमत्कारी फायदे, अधिक माहिती जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/know-what-are-the-benefits-of-cucumber-seeds-nrsr-137300.html”]
चीनचा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा जास्त प्रकाश आणि ऊर्जा देईल. कृत्रिम सूर्याचं तापमान तो सक्रिय होताच खऱ्या सूर्याच्या तुलनेत १० पट अधिक होतं. याआधी कृत्रिम सूर्याचं तापमान १६ कोटी डिग्री सेल्सियसवरदेखील गेलं होतं. कृत्रिम सूर्याचं तापमान १२ कोटी डिग्री सेल्सियसवर जाणं मोठं यश असल्याचं चिनी शास्त्रज्ञांनी सांगितलं.
[poll id=”50″]
कृत्रिम सूर्याच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञांनी आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. याआधी कृत्रिम सूर्याचं तापमान सलग १०० सेकंद १० कोटी डिग्री सेल्सियसवर ठेवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं. मात्र आता शास्त्रज्ञांनी हेच तापमान १६ कोटी डिग्री सेल्सिअसवर नेण्यात यश मिळवलं आहे. आता यापुढे रिऍक्टरचं लक्ष्य एक आठवडा तापमान स्थिर ठेवणं असेल, अशी माहिती शेन्जेनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिक विभागाचे संचालक ली मियाओ यांनी दिली.