ऑस्ट्रेलिया 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SL, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात टॉस गामावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार मीचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेसमोर १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात श्रीलंकेने १८ षटकांत १८२ धावांचे लक्ष्य गाठले.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यू), पवन रथनायके, दासुन शनाका (क), कामिंदू मेंडिस, दुशन हेमंथा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कूपर कोनोली, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा






