फोटो - icc
मेन्स टी- २० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वुमन्स टी- २० वर्ल्ड कप स्पर्धा देखील लवकर होणार आहे. या स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. जवळपास ४० ते ४२ दिवस या स्पर्धेसाठी शिल्लक राहिले आहेत. दरम्यान या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. यंदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे ९ वे पर्व असणार आहे. आतापर्यंत झालेल्या ८ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ६ वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकविले आहे. ९ व्या वूमनस टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.
येत्या ३ ऑक्टोबरपासून वूमन्स टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेला अजून ४० ते ४२ दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिलांच्या संघाने नेतृत्व हे यष्टीरक्षक ॲलिसाकडे देण्यात आले आहे. यामध्ये जेस जोनासेन या अनुभवी डावखुरी गोलंदाजाला वगळण्यात आले आहे.
हेही वाचा: Pak Vs Ban: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाकिब अल हसनने केले असे काही…; सोशल मीडियावर Video व्हायरल
जेस जोनासन आतॊत्र्यन्त २०४ सामने खेळले असून त्यात २४४ विकेट्स घेतल्या आहेत. २०२३ च्या अखेरीस तिने भारताविरुद्ध वानखेडे मैदानावर शेवटचा सामना खेळला होता. मात्र यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तिला स्थान देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ हा भारताच्या गटात असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना हा ४ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. औट्रेलियाचा संघ ८ ऑक्टोबरला पाकिस्तान, ११ ला न्यूझीलंड आणि १३ ऑक्टोबरला भारताविरुद्व खेळणार आहे. आधी ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये होणार होती. मात्र तेथील उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने ही स्पर्धा आता दुबईत (UAE) मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा शारजा येथे होणार आहे.
Introducing our 2024 Women's @T20WorldCup squad 🇦🇺
Our @AusWomenCricket will take on New Zealand in a three-match T20I series in Mackay and Brisbane before travelling to the UAE to defend their World Cup crown 👊 pic.twitter.com/qJQVRXASA5
— Cricket Australia (@CricketAus) August 26, 2024
ऑस्ट्रेलिया टी२० वर्ल्ड कप संघ – लिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, ॲनाबेल सदरलँड , जॉर्जिया वेरेहॅम, टायला व्लेमिंक